जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश करताना वस्त्र संहितेनुसार कपडे परीधान करावे लागणार आहेत. अंग प्रदर्शन करणारे, अशोभनीय किंवा तोकडे कपडे घालण्यास या वस्त्रसंहितेनुसार बंदी असणार आहे. तशा प्रकारचे बोर्ड जिल्ह्यातल्या वस्त्र संहिता लागू केलेल्या मंदिरांच्या बाहेर लावण्यात येणार आहेत. मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी आणि मंदिरांचे पावित्र राखण्याकरीत मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू व्हावी अशी मागणी होत होती. आजपर्यंत राज्यात २३२ मंदिरांनी वस्त्रसंहिता स्वीकारली आहे. त्यामध्ये ५० मंदिरे ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील काही मंदिरांम ध्ये वस्त्र संहिता लागू झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांनादेखील त्याचे पालन करावे लागणार आहे. कुणीही भाविक अजाणतेपणे तोकडे किंवा अशोभनीय कपडे घालून आल्यास त्या महिला किंवा पुरुष यांना विनंती करून इतर काही कपडे दिले जाणार आहेत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सम न्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणपतीपुळे मंदिर संस्थानसोबत देखील याबाबत बोलणे झालेले आहे. पण वस्त्रसंहितेबाबत गणपतीपुळे मंदिर प्रशासन अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ग्रामदेवता श्री नवलाई मंदिर, नाचणे, श्री साई मंदिर, गोडाऊन स्टॉप, नाचणे, श्री विश्वेश्वर मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, श्री नवलाई मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, श्री ज्योतिबा मंदिर, पेठ किल्ला, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा, श्री दत्त मंदिर खालची आळी, श्री मारुती मंदिर संस्था (दक्षिणाभिमुख मारुती मंदिर), मारुती मंदिर, श्री साई मंदिर, मोडेवाडी, मिरजोळे, श्रीकृष्ण मंदिर, श्री महापुरुष मंदिर, वरचीवाडी, मिरजोळे, श्री लक्ष्मीकांत मंदिर, मिरजोळे, श्रीराम मंदिर, पावस, श्री अंबा माता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज सभागृह, श्री चंडिका माता मंदिर, गणपतीपुळं, श्री सोमेश्वर सूंकाई एन्डोमेंट ट्रस्ट, सडये, पिरंदवणे, श्री भार्गवराम मंदिर, परटवणे, रत्नागिरी, स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास, कारवांचीवाडी येथे वस्त्रसंहिता लागू केली आहे.
राजापूर तालुक्यात श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, श्री निनादेवी मंदिर, श्री कामादेवी मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गुजराळी, श्री चव्हाटा मंदिर, जवाहर चौक, श्री महाकाली मंदिर आडिवरे, श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, श्रीसत्येश्वर मंदिर, श्री जाकादेवी मंदिर, कशेळी, श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे येथे वस्त्रसंहिता फलक लावले गेले आहेत. चिपळूण तालुक्यात श्री गणेश मंदिर, मावळत वाडी, कालुस्ते, श्री हनुमान मंदिर, कुंभार वाडी, भिले, श्री देव सिध्देश्वर मंदिर (सिध्देश्वरप्रतिष्ठान), भिले, श्री देव महादेव भानोबा कालेश्री देवस्थान भिले धामेली ट्रस्ट, श्री लक्ष्मीकांत देवस्थान, गांग्रई, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, गांग्रई, श्री दत्त मंदिर, दत्तवाडी, गांग्रई, श्री. खेम वाघजाई मंदिर, ग्रामदैवत, बिवली-करंबवणे ग्रामदैवत, श्री गणेश उत्कर्ष मंडळ, बांद्रेवाडी, मालदोली, श्री देव जुना कालभैरव मंदिर, श्री विंध्यवासीनि मंदिर, रावतळे, श्री शिव मंदिर, चिपळूण, श्री काळेश्री मंदिर, कान्हे, श्री हनुमान मंदिर, पिंपळी; श्री हनुमान मंदिर, पेढांबे, श्री गणेश मंदिर, नांदिवसे, श्री रामवरदायिनी मंदिर, दादर, श्री मुरलीधर मंदिर, चिपळूण, श्री राम वरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, मजरे दादर (दसपटी) आदी मंदिरांचा समावेश आहे.