25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriअस्वच्छतेमुळे ५१ दुकानदारांना दंड, अन्न व औषध प्रशासन

अस्वच्छतेमुळे ५१ दुकानदारांना दंड, अन्न व औषध प्रशासन

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे ५६ लाख २३ हजार परवानाधारक आहेत.

ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ व उत्पादने मिळावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने स्वच्छतेवर भर देत काही आस्थापनांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. अस्वच्छता ठेवणाऱ्या ५१ परवानाधारकांवर या विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे; तर त्रुटींमध्ये सुचवलेल्या सुधारणा न करणाऱ्या १५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून ६ जणांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांमध्ये ही कारवाई केली आहे. जिल्ह्याची जबाबदारी असताना या विभागाच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे, तरी चांगल्यापद्धतीने या विभागाची कारवाई सुरू आहे.

पंधराच्यावर कामगार असलेल्या परवानाधारक आस्थापनेमध्ये संबंधित कामांचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागाकडून तेथील कामगाराला प्रशिक्षित केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकाशी कसे वागावे, कसे बोलावे, स्वच्छता कशी ठेवावी, आदी धडे यामध्ये दिले जात आहेत. ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ आणि उत्पादने मिळावीत हा यामागील मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे ५६ लाख २३ हजार परवानाधारक आहेत. त्यांनी दिलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. या नूतनीकरणातूनच या विभागाला उत्पन्न मिळते. परवाना नूतनीकरणाच्या शुल्कातून १७ लाख ६६ हजार ५०० एवढा महसूल मिळवला आहे.

या विभागाकडून झालेल्या तपासणीत अस्वच्छता ठेवलेल्या ५१ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार १०० एवढा दंड वसूल केला आहे. अस्वच्छता आढळून आलेल्या आस्थापनेला या विभागाने सुधारणा सुचवल्या होत्या त्या पूर्ण न केलेल्या १५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारणे दाखवा नोटीस देऊनही सुधारणा न केलेल्या ६ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular