28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeChiplunपेढांबेत वादळी पावसाचा तडाखा, केळी बागेचे ८ लाखांचे नुकसान

पेढांबेत वादळी पावसाचा तडाखा, केळी बागेचे ८ लाखांचे नुकसान

पाच एकरमध्ये २५ लाखांची केळी लागवड केली होती.

तालुक्यातील पेढांबे येथील केळीच्या बागेचे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पावसाने हिरावून घेतले आहे. यामध्ये बागायतदार संतोष शिंदे यांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी (ता. २०) येथे झालेल्या पावसात काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. गेल्या आठवडाभरापासून येथे पावसाने धुमशान घातले. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक नुकसान झाले. त्यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. अजुनही काही ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या नुकसानीत आणखी वाढ होणार आहे. त्याव्यतिरिक्त महावितरणचेही ५१ लाखाचे नुकसान झाले आहे.

अजुनही काही गावातील वाड्या अंधारात असून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. अशातच सोमवारी पुन्हा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात पूर्व विभागातील अलोरे, पिंपळी, नागावे, खेर्डी, खडपोली, सती, चिंचघरी, पेढांबे या भागात या वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. कान्हे बौद्धवाडी येथील जयवंत जयराम मोहिते यांच्या घराचे छत उडून गेले. त्यामुळे हे कुटुंब बेघर झाले आहे. याच पद्धतीने पूर्व विभागातील काही घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पेढांबे येथे मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये केळीचे पीक आडवे झाले आहे.

संतोष शिंदे यांची केळीची बाग या पावसामध्ये जमिनदोस्त झाली. त्यांनी पाच एकरमध्ये २५ लाखांची केळी लागवड केली होती. येत्या महिनाभरात ही केळी चिपळूण बाजारपेठेत विक्रीस येणार होती. या वादळी वाऱ्यामुळे ही केळीची बाग जमिनदोस्त झाली. यामध्ये त्यांचे आठ लाखांचे नुकसान झाले असून आमदार शेखर निकम यांनी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष शिंदे यांची चौकशी केली व कृषी विभागाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular