26.6 C
Ratnagiri
Monday, November 4, 2024

OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन 24GB RAM आणि 1TB स्टोरेजसह लॉन्च …

चीनी टेक कंपनी OnePlus च्या नवीन फ्लॅगशिप...

भारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

बंगळूर आणि पुणे कसोटीत भारतीय संघाच्या पराभवात...
HomeChiplunमहामार्गावर पथदीप बसवण्यासाठी ८० कोटी मंजूर मात्र, उजेडच नसल्याने वळणावर सातत्याने अपघात

महामार्गावर पथदीप बसवण्यासाठी ८० कोटी मंजूर मात्र, उजेडच नसल्याने वळणावर सातत्याने अपघात

भरणेतील उड्डाण पुलावर उभारण्यात आलेल्या पथदीपांना उजेडच नसल्याने अपघात घडत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला आहे. मात्र महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पथदीपांच्या उजेडाची वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. महामार्गावर पथदीप बसवण्यासाठी तब्बल ८० कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे. भरणेतील उड्डाण पुलावर उभारण्यात आलेल्या पथदीपांना उजेडच नसल्याने वक्राकार वळणावर सातत्याने अपघात घडत आहेत. मात्र तरी देखील राष्ट्रीय महामार्ग खाते निद्रिस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चौपदरीकरणामुळे महामार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास गतिमान झाला असला तरी अजूनही नानाविध सुविधांचा अभाव आहे.

चौपदरीकरणात सर्व्हिस रोड़सह आवश्यक त्या ठिकाणी पुलांची कमतरता असल्याचा सूर आळवला जात आहे. याशिवाय महामार्गावर कुठेही स्वच्छतागृहाची अद्याप उभारणी करण्यात आलेली नाही. यामुळे वाहनचालकांची विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे. चौपदरीकरणानंतर महामार्गावर विशेषतः उड्डाण पुलासह छोटे-मोठे पूल व धोकादायक ठिकाणी, पथदीप उभारणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी तब्बल ८० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे.

या निधीतून महामार्गावर ठिकठिकाणी पथदीपांची उभारणी करण्यात आली असली तरी अजूनही महामार्गावरील पथदीप बंदावस्थेत आहेत. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरील पथदीपही अजून बंद आहेत. यामुळे विशेषतः रात्रीच्या सुमारास वाहनचालकांची फसगत होत असून सातत्याने अपघात देखील घडत आहेत. विशेषतः अवजड वाहनांच्या अपघातांची मालिका सुरूच असून दुभाजकाची नासधूस देखील होत आहे. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खाते अजूनही ठोस उपाययोजना अवलंब दिसत नाही.

करताना याशिवाय उड्डाण पुलावर पथदीप उभारूनही अद्याप ते बंद आहेत. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे गेल्या दोन महिन्यात नव्या जगबुडी पुलावर पाच अपघात घडले असून जीवित हानी झाली नसली तरी वाहनाच्या नुकसानी सह दुभाजकाची मोडतोड झाली आहे

RELATED ARTICLES

Most Popular