27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiri८ शिकाऱ्यांना पकडले संगमेश्वर-रत्नागिरीत उडाली एकच खळबळ

८ शिकाऱ्यांना पकडले संगमेश्वर-रत्नागिरीत उडाली एकच खळबळ

शिकार करण्याच्या उद्देशाने बंदूक व साहित्य घेऊन वावरताना आढळून आले.

संगमेश्वर तालुक्यातील मासरंग या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने फिरणाऱ्या ८ जणांना सिंगल बॅलर बंदूक, जिवंत काडतूस व इतर मुद्देमाल व चारचाकी वाहन सहित संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेण्याची धडाकेबाज कामगिरी केली. मासरंग शेनवडे रस्त्यावर शुक्रवार १२ एप्रिल रोजी रात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली. वन्य प्राण्यांची शिकार करणारेच पोलिसांच्या सापळ्यात सापडल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्देश आंब्रे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ अव्हाड, होमगार्ड मोहिते हे पोलीस वाहनाने रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तालुक्यातील मासरंग शेनवडे रस्त्यावर एमएच ०८ ई ०९५० असा क्रमांक असलेल्या महिंद्रा पिकअप बोलेरो चारचाकी वाहनातून ८ लोक वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने बंदूक व साहित्य घेऊन वावरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याच्याकडे सापडलेली बंदूक, शक्तिमान १२ एक्सप्रेस नं दीडशे रुपये किमतीचे एक काडतूस, शक्तिमान १२ एक्सप्रेस ४.८ संहाशे रुपये किमतीचे चार काडतूस आणि विजेऱ्या सहा बॅटऱ्या पिकअप बोलेरो असा एकूण २,५७, २५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दशरथ दिलिप बारगोडे वय ३९ राहणार पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, जि. रत्नागिरी, विजय भिकार्जी पाचकुडे वय ४२ राहणार शेनवडे ता. संगमेश्वर, सुभाष दाजी बोबळे वय ५० राहणार शेनवडे, चिलेवाडी ता. संगमेश्वर, गणेश गंगाराम लाखन वय ३२ राहणार शेनवडे, खालचीवाडी ता. संगमेश्वर, सत्यवान सिताराम जोगळे वय ३८ राहणार शेनवडे ता. संगमेश्वर, रमेश सिताराम लाखन वय ४३ वय राहणार शेनवडे खालचीवाडी ता. संगमेश्वर, सुरेश मोळू जोगळे वय ३८ राहणार शेनवडे जोगळेवाडी ता. संगमेश्वर, दिलिप रामचंद्र बारगोडे पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या ८ संशयीतांची नावे असून जप्त केलेली बंदूक दिलिप रामचंद्र बारगोडे यांच्या नावे शेती सरक्षण परवाना असलेली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात या सर्वांवर भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कांबळे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular