कोकण मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मंगळवारी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत घेण्यात आलेल्या ३ तासांच्या मेगाब्लॉकमुळे ८ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला. तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस साडेतीन तास, तर तिरुवअनंतपूरम- एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस अडीच तास विलंबाने मार्गस्थ झाली. विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला. १०१०५ क्रमांकाची दिवा- सावंतवाडी -एक्सप्रेस १ तास तर १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी दिवा पॅसेंजर १ तास २५ मिनिटे उशिराने धावली. १२०५२ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस १ तास ५ मिनिटे तर १२४४९ क्रमांकाची गोवा संपर्क क्रांती १ तास विलंबाने रवाना झाली.
१०१०३ क्रमांकाची सीएसएमटी -मडगाव मांडवी एक्सप्रेस ५० मिनिटे तर ०२१९७ जामनगर एक्सप्रेसच्या प्रवाशांची साडेतीन तास रखडपट्टी झाली. नेत्रावतीही धावली अडीच तास विलंबाने कोईमतूर-जबलपूर एक्सप्रेस ४५ मिनिटे उशिराने धावली. १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीम- एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस ४० मिनिटे विलंबाने धावली. १२६६० क्रमांकाची कोच्युवेली एक्सप्रेस १ तास तर १५६३३४ क्र.ची तिरुवअनंतपूरम – वेरावल एक्सप्रेसही ५० मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक पूर्व नियोजित होता. मात्र विलंबाने धावू शकणाऱ्या संभाव्य रेल्वेगाड्यांशिवाय इतर ८ रेल्वेगाड्यांनाही फटका बसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.