27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRajapurराजापुरात अर्जुना नदीमध्ये उडी घेत तरुणीची आत्महत्या

राजापुरात अर्जुना नदीमध्ये उडी घेत तरुणीची आत्महत्या

विषारी द्रव्य प्राशन करून नंतर तिने नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

राजापूर शहरालगतच्या बंगलवाडी गुरववाडी येथील प्रांजली कृष्णा गुरव (१९) या तरूणीने अर्जुना नदीत उडी घेत आत्महत्या केली. घटना बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान विषारी द्रव्य प्राशन करून नंतर तिने नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील अर्जुना नदीपात्रातील वरचीपेठ येथील मोठ्या पुलाखालून पाण्यात एक तरूणी वाहून जात असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या पादचायांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती वरचीपेठ येथील नागरीकांना दिली. त्यानंतर वरचीपेठ येथील तरूण विनोद बाकाळकर, रवी बाकाळकर, दत्तप्रसाद पटेल, दिनेश जावकर यांनी नदीकडे धाव घेत सदर तरूणीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह व खोली जास्त असल्याने त्यांना यश आले नाही.

दरम्यानच्या काळात काहींनी खडपेवाडी येथील प्रज्योत खडपे, अनु खटावकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. या दोघांनीही नदीपात्रात पोहत जाऊन तरूणीला बाहरे काढले. त्यानंतर राकेश बेनकर यांच्या रिक्षातून तीला राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सदर तरूणी मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रांजली कृष्णा गुरव असे या तरूणीचे नाव असून तिने नदीत उडी घेण्यापूर्वी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, शहर अध्यक्ष विवेक गुरव, अरविंद लांजेकर यांच्यासह बंगलवाडी येथील ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली. या प्रकरणाची खबर राजापूर पोलिसांना देण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान प्रांजली हिने आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकलेले नसून अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular