26.4 C
Ratnagiri
Thursday, November 7, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeRajapurराजापूर पालिकेची ८६ टक्के करवसुली, ऑनलाईन सुविधेला प्रतिसाद

राजापूर पालिकेची ८६ टक्के करवसुली, ऑनलाईन सुविधेला प्रतिसाद

कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे थेट जाहीर फलकावर लावण्यात आली.

राजापूर नगर पालिकेने यावर्षी ८६ टक्के करवसुली करण्यात यश संपादित केले आहे. त्यामध्ये घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करभरणा करण्याची सुविधाही पालिकेने उपलब्ध करून दिली होती. त्यालाही करदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना ऑनलाईन पद्धतीने १८ लाख ४५ हजार ६१०, तर क्युआर कोडद्वारे ५० हजार ७१८ असे मिळून १८ लाख ९६ हजार ३२८ रुपयांची वसुली झाली आहे. राजापूर पालिकेची करवसुलीची १ कोटी ९८ लाख ४८ रुपयांची मागणी होती.

त्यापैकी १ कोटी ७१ हजार रुपयांची वसुली झाली आहे. त्यामध्ये मालमत्ता आणि इतर करांची ८७.२९ टक्के, तर पाणीपट्टीची ८१.१६ टक्के वसुलीचा समावेश आहे. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजनबद्द राबवलेल्या करवसुली मोहिमेमुळे पालिकेला करवसुली करण्यात यश आले आहे. कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे थेट जाहीर फलकावर लावण्यात आली. काही थकबाकीदारांची नळसंयोजनेही कापत करवसुलीची धडक मोहीम राबवली होती. त्यातून ८६ टक्के कर वसुली झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular