27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiri'अब की बार चारसो पार' म्हणणाऱ्यांना तडीपार करण्याची हीच ती वेळ; भास्कररावांची तोफ धडाडली

‘अब की बार चारसो पार’ म्हणणाऱ्यांना तडीपार करण्याची हीच ती वेळ; भास्कररावांची तोफ धडाडली

मराठा भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. 

आजची निवडणूक ही भाजपा विरुध्द नागरिक अशी असल्याचे सांगत, लोकशाही टिकवण्याची व हुकुमशाही मिटवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे. सामाजिक भेद्भाव मिटवण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सर्व काही समजत असल्याने आता मशाल पेटवण्याची ही वेळ आली आहे. अब की बार चारसो पार म्हणणाऱ्यांना तडीपार करण्याची वेळ आली आहे’, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी येथे केली. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. शिवसैनिकांचा मेळावा मंगळवारी खा. विनायक राऊत यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला. त्यापूर्वी मराठा भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा पार पडला.

या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार राजन साळवी, वैभव नाईक, सिंधुदूर्गमधून माजी आमदार प्रवीण भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, माजी आमदार सुभाष बने, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ४०० पारवाल्यांना तडिपार करा मागील १० वर्ष मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत कार्यरत असून लोकांच्या सुखदुःखात उभे रहात आहेत.

आपल्या माणसाच्या पाठिशी उभे राहताना ४०० पार वाल्यांना आता तडीपार करण्याची वेळ आली असल्याचे आवाहन शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केले. भाजपविरूद्ध जनता लढाई यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आजची निवडणूक ही भाजपा विरुध्द नागरिक अशी असल्याचे सांगत, लोकशाही टिकवण्याची व हुकुमशाही मिटवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे. सामाजिक भेदभाव मिटवण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सर्व काही समजत असल्याने आता मशाल पेटवण्याची ही वेळ असल्याचे आ. भास्कर जाधव म्हणाले.

ओरिजनल बीजेपी आहे कुठे? आताच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील याबद्दल शंका कुणाच्याही मनात नसल्याचे सांगतानाच. सध्या ‘ओरिजनल बीजेपी’ आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. विविध आरोप, घोटाळ्यांनी बरबटलेल्यांनाच भाजपाने पक्षात प्रवेश दिला असल्याने आता भेकड लोकांना उत्तर देण्याची गरज नसल्याचेही आ. जाधव यांनी सांगितले. मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. त्यातील एकही पुरे झाले नाही, १५ लाखांचे आश्वासनही हवेत विरुन गेले आहे. त्यामुळे आता त्यांना तडीपार नव्हे तर हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular