24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriचार कंपन्यांकडे ९.५ कोटी रॉयल्टी थकीत, मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदार कंपन्या

चार कंपन्यांकडे ९.५ कोटी रॉयल्टी थकीत, मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदार कंपन्या

केंद्र आणि राज्यशासन या कामावर नजर ठेवून आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी गौण खनिज (काळा दगड) उत्खननाची रॉयल्टी थकवली असून, हा आकडा ९.५ कोटींवर पोहोचला आहे. या कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेतक एंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांचा यात समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. गेली १३ ते १४ वर्षे झाली, या महामार्गाचे काम सुरू आहे. याचे सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका दिला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले, त्याच्याऐवजी दुसऱ्या कंपन्यांना काम दिले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यशासन या कामावर नजर ठेवून आहे.

त्यामुळे काही प्रमाणात कामाला गती मिळाली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे.  कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाची रॉयल्टीच भरली नसल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही. त्यासाठी महसूल विभागाने कोल्हापूरच्या येथील इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) कंपनीकडून या उत्खननाचा सव्र्व्हे केला. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे.

ईगल इन्फ्रा प्रा. लि. वांद्री (संगमेश्वर) येथे ५१३३४ ब्रास जादा उत्खनन केले आहे. त्यामुळे त्यांना ३ कोटी ८ लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे. चेतक एंटरप्रायझेस यांनी हडकरी (चिपळूण) येथे २८६६ ब्रास उत्खनन केले आहे. १७ लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे. रवी इन्फ्रा या कंपनाने वांद्री (संगमेश्वर) येथीर ५८६४६ ब्रास उत्खनन केले असून, २ कोटी ३२ लाख रॉयल्टी भरलेली नाही आणि जे. एस. म्हात्रे कंपनीने वांद्री (संगमेश्वर) येथे ६६९१० ब्रास काळ्या दगडाचे उत्खनन केल्यामुळे त्यांना ४ कोटी रुपये रॉयल्टी भरावी लागणार आहे. एकूण साडेनऊ कोटी रुपये रॉयल्टी या कंपन्यांकडून येणे बाकी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कंपन्यांना नोटीस बजावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular