23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriसंगमेश्वर स्थानकात प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ, ९ रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी

संगमेश्वर स्थानकात प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ, ९ रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी

कोकण रेल्वेला ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ एवढे भरघोस उत्पन्न मिळाले.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाने कोकण रेल्वेला गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी उत्पन्न दिले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून लांब पल्ल्यांच्या अतिरिक्त गाड्याना थांबा द्यावा, स्थानकावरील दोन फलाटाना जोडणारा पादचारी पुल उभारावा तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण इत्यादी मागण्या कधी पुर्ण होणार असा सवाल प्रवासी विचारत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातुन जवळपास ६ लाख प्रवाश्यांनी प्रवास केला. त्यातुन कोकण रेल्वेला ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ एवढे भरघोस उत्पन्न मिळाले. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासूनचे हे सार्वाधिक उत्पन्न आहे.

दरम्यान मध्यंतरी निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या गृपने पत्राद्वारे कोंकण रेल्वे प्रशासनाकडे ९ गाड्याना थांबा मिळण्याची मागणी केली होती. या गृपने रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वरसाठी एलटीटी मडगाव एक्सप्रेस, जामनगर, जबलपूर, गांधीधाम, कोचीवली, वेरावल, जनशताब्दी, तेजस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्याना थांबा मिळण्याची मागाणी केली आहे. येत्या काही दिवसांत मतदार प्रक्रिया पार पडून जून मध्ये नवनिर्वाचित खासदारांचा कार्यकाळ सुरु होईल. आगामी काळात संगमेश्वर सारख्या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर लक्ष देवुन प्रवाशांचे होणारे हाल कमी करावेत अशी अपेक्षा प्रवासी वर्गातुन होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular