26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeChiplunचिपळुणात मतदारांचा उत्साह मात्र यंत्र बिघडल्याने रात्रौ उशीरापर्यंत गर्दी

चिपळुणात मतदारांचा उत्साह मात्र यंत्र बिघडल्याने रात्रौ उशीरापर्यंत गर्दी

मतदानाची वेळ संपुष्टात परंतु काही केंद्रावर मशीन स्लो तर काही केंद्रावर बिघाडामुळे मतदार अक्षरशः रखडले.

तालुक्यासह चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवला. सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांचा सहभाग लक्षणीय दिसत होता. तर नवमतदारांनी देखील आवर्जून हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. दुपारी काहीशी शांतता होती. परंतु सायंकाळी ४ वाजता पुन्हा गर्दी वाढली. मतदानाची वेळ संपेपर्यंत केंद्रावर गर्दी कायम होती. मतदानाची वेळ संपुष्टात परंतु काही केंद्रावर मशीन स्लो तर काही केंद्रावर बिघाडामुळे मतदार अक्षरशः रखडले. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मतदारांचा उत्साह आणि झालेले मतदान पाहता सुमारे ६० ते ६५ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. या मतदारसंघात एकूण ९ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. एकूणच प्रचार पाहता प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशीच झाल्याचे चित्र दिसून येत होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काहीशी रंगत पहावयास मिळाली परंतु शेवटपर्यंत प्रचार अतिशय शांततेत झाला होता. रविवारी प्रचाराची सांगता झाल्यानंतर मतदानासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली होती.

कमालीची उत्सुकता – चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रावर चोख अशी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती. मतदानापूर्वीच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत होता. मतदारांमध्ये दिसणारा उत्साह मतदान पेटीमध्ये उतरतो का? याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली होती.

सकाळी लागल्या रांगा – सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच काही मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. ते पहाता यावेळी उत्स्फुर्तपणे मतदान होणार अशी चिन्हे दिसून येत होते. सकाळी मतदान सुरू झाले आणि पहिल्या दोन तासात म्हणजेच ९ वाजेपर्यंत सुमारे ११ टक्के मतदान झाले होते. पुढे मतदान केंद्रावरील गर्दी आणखी वाढू लागली. सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के इतके मतदान झाले होते. दरम्यान उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मतदानावर परिणाम होईल अशी शक्यता होती. परंतु उन्हाची देखील पर्वा न करता रणरणत्या उन्हातून देखील मतदार म तदानासाठी येत होते. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४७ टक्के इतके मतदान झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular