26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeKhedखेड आगाराला उन्हाळी सुटीत ९९ लाखांचे उत्पन्न - १२ जादा गाड्या

खेड आगाराला उन्हाळी सुटीत ९९ लाखांचे उत्पन्न – १२ जादा गाड्या

येथील एसटी आगारातून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुटी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या १२ जादा गाड्यांतून आगाराला ९९ लाख २० हजार ६३२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. साडेबारा लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, यात महिला सन्मान योजनेचे निम्मे प्रवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या एसटीला उन्हाळी सुट्टी हंगामात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगारप्रमुख दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकप्रमुख नंदकुमार जाधव यांच्यासह चालक-वाहक, कार्यशाळेचे कर्मचारी व अधिकारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे उन्हाळी सुट्टी हंगामात ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसफेऱ्यां नियोजनबद्ध धावल्या.

या नियमित बसफेऱ्यांसह तुळशीमार्गे बोरिवली, विरार, शिर्डी, भांडूप, विठ्ठलवाडी, मुंबई, ठाणे, पुणे, नालासोपारा आदी मार्गांवर १२ जादा गाड्या सोडण्यात आल्या. या ज्यादा गाड्यांनी एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यात दोन लाख ९७ हजार ६४ प्रवाशांना घेऊन ४९ हजार ७१८ किलोमीटरचे अंतर कापले. यातून १३ लाख ३७ हजार ७२७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेमध्ये सहा लाख ७८ हजार ९२० प्रवाशांनी जादा फेऱ्यांमधून प्रवास केला. यासाठी जादा गाड्या एक लाख ६७ हजार ९६० किलोमीटर धावल्या. यातून ५९ लाख ७० हजार १२० रुपयांचे वाहतूक उत्पन्न प्राप्त झाले; तर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात धावलेल्या जादा गाड्यांनी दोन लाख ७१ हजार ४३३ प्रवाशांना घेऊन ५९ हजार ९७४ किलोमीटर अंतर पार केले. यातून २६ लाख १२ हजार ७८५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात सर्वाधिक लाभ महिला सन्मान योजनेच्या महिला प्रवाशांना मिळाला असून, सुमारे सहा लाख २० हजार लाभार्थ्यांनी प्रवास केला.

RELATED ARTICLES

Most Popular