येथे आयोजित जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीतील तायक्वाँदो खेळाडूंनी बाजी मारली. तायक्वाँदो असोसिशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्ट असोसिएशन सहकार्याने एस. आर. के. तायक्वाँदो क्लबने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे ही अजिंक्यपद स्पर्धा घेतली. स्पर्धेत रत्नागिरीतील क्लबच्या खेळाडूंनी विशेष गटापासून वरिष्ठ गटापर्यंत २२ सुवर्ण, ११ रौप्य आणि १४ कास्यपदके जिंकली. या स्पर्धेत खेळात नव्याने वाटचाल करणाऱ्या लहान खेळाडूंना विशेष गटात संधी देण्यात आली. याही गटात मुलांनी आपल्या क्रीडागुणांची चुणूक दाखवली. विशेष गटात प्रशिक कांबळे, राधा रेवाळे, वेदिका पवार यांनी सुवर्णपदक पटकावले.
रौप्य पदक सार्थक जोशी, ओम रेवाळे, सोरेन प्रताप यांना व कास्यपदक रावी वारंग, राजवीर सावंत, पार्थ वैशंपायन, शिवांश वर्मा, तिर्था लिंगायत यांनी मिळवले. या स्पर्धेत पुमसे प्रकारात फ्री स्टाईलमध्ये आर्या शिवदे रौप्य पदक, सांघिक रौप्य पदक स्वरा साखळकर, केतकी चिगरे, मृण्मयी वायंगणकर, फ्री स्टाईल पुमसे कास्यपदक स्वरा साखळकर, वैयक्तिक पुमसे प्रकारातही स्वरा साखळकर हिला कास्यपदक मिळाले. या स्पर्धेला महिला प्रशिक्षक म्हणून आराध्या मकवाना, प्रसन्ना गावडे यांनी काम पाहिले. पंच म्हणून शीतल खामकर, मनाली बेटकर यांनी काम केले.
विजेत्यांची नावे अशी – सुवर्ण पदक क्योरोगी (फाईट) विजेते- सबज्युनिअर -सुरभी पाटील, स्वर्णिका रसाळ, स्वरा साखळकर, आराध्य सावंत, मृण्मयी वायंगणकर, विधान कांबळे, रूद्र शिंदे, आभा सावंत, भक्ती डोळे. कॅडेट – गौरी विलणकर, – सार्थक चव्हाण, मृदुला पाटील. ज्युनियर – त्रिशा मयेकर, गायत्री शेलार, आदिष्टी काळे, ऋतिक तांबे, ओम अपराज, कृपा मोरये. सीनियर – वेदांत चव्हाण, अमेय सावंत, सई सावंत, सुजल सोळंके. रौप्यपदक विजेते- सबज्युनिअर- बरखा संदे, रावी वारंग, समर्थ जोशी, केतकी चिगरे, साईराज चव्हाण, त्रिशा लिंगायत, राधा रेवाळे, दीक्षा सिंग. कॅडेट – पार्थ कांबळे, आनंद भोसले. सीनियर – प्रसन्ना गावडे. कास्यपदक विजेते- सबज्युनियर- उर्वी कळंबटे, रूद्र शिवदे, राजवीर सावंत, चैतन्य कडू, पार्थ वैशंपायन, साकेत पारकर, यश भागवत, वेदिका कडू. कॅडेट – स्मित कीर, तुषार कोळेकर, सान्वी मयेकर, ज्युनियर – देवन सुपल, आर्या शेणवी, सीनियर समर्था बने.