रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौरा असणार आहे. चिपळूण मधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे असणार आहे. सर्वप्रथम सकाळी १०:०० वाजता रत्नागिरी चिपळूण नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ते हार अर्पण करतील. व चिपळूण नगरपरिषद ते बहादूर चेक नाका येथे पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी १०:४० वाजण्याच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ते पुष्पहार अर्पण करतील.
सकाळी ११:०० वाजता डी. बी. जे कॉलेज चिपळूण येथे म.न.वी. से युनिट उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी ११:३० वाजता हॉटेल अभिरुची हॉल येथे संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तालुक्यातील म.न.वी. से पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर १२:३० वाजता ते खेड कडे प्रस्थान करतील. दुपारी १:०० वाजता खेड भरणे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. दु. ०१:१५ वा.. म.न.वी. से पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कडून स्वागत व खेडकडून दापोलीकडे प्रस्थान करतील. दुपारी २:०० वाजता दापोली येथे दुपारचे जेवण करून दुपारी २:३० वाजता एस टी स्टॅन्ड दापोली येथे त्यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून भव्य स्वागत असणार आहे.
म.न.वी.से. च्या पदाधिकाऱ्यांची दुपारी ३:०० वाजता फाटक कॅपिटल हॉल दापोली येथे खेड, दापोली व मंडणगड बैठक होणार आहे. सायंकाळी ५:०० वाजता कोकण कृषी विद्यापीठ पाहणी व विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता दापोलीकडून महाडकडे प्रस्थान करतील. असा अमित ठाकरे यांचा पूर्ण १ दिवसीय महासंपर्क दौऱ्याचा कार्यक्रम असणार आहे.
खेड माजी नगराध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यानी दुपारी ३:०० वाजता फाटक कॅपिटल हॉल दापोली येथे होणाऱ्या खेड, दापोली व मंडणगड म.न.वी.से. च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्व पदाधिकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.