31.6 C
Ratnagiri
Tuesday, May 21, 2024

दिल्लीतून मागवले ऑनलाईन नकली दागिने, मुलामा देऊन तारण

कोल्हापूर येथील तो सोनार दिल्लीहून ऑनलाईन दागिने...

तुंबाड येथे जगबुडीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू

तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेल्या...

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...
HomeMaharashtraजनतेच्या विकासापेक्षा ठाकरे म्हणून माझा अहंकार मोठा - आशिष शेलार

जनतेच्या विकासापेक्षा ठाकरे म्हणून माझा अहंकार मोठा – आशिष शेलार

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघांत आम्ही भाजपा पक्ष जिंकेल अशी पायाभरणी सुरू केली आहे

ठाकरे सरकार असताना त्यांनी असे असंख्य प्रकल्प रखडविले. स्वतःच्या अहंकारापोटी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केंद्र सरकारच्या योजना आणि विकास कामे राबविण्यात अनेक अडथळे आणले. जनतेच्या विकासापेक्षा ठाकरे म्हणून माझा अहंकार मोठा आहे हेच उद्धव ठाकरे यांनी पडद्याआडून सातत्याने दाखवून दिले. त्याचाच एक परिणाम म्हणून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपेक्षित पद्धतीने झाले नाही आणि त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही.

आता डबल इंजिनचे सरकार आहे राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार तर देशात मोदींचे सरकार आणि त्यांच्या सरकारमध्ये नारायणराव राणे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे आता या चौपदरीकरणाच्या कामाला दस पटीने पुढे घेऊन जाऊ असा विश्वास भाजपा नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघांत आम्ही भाजपा पक्ष जिंकेल अशी पायाभरणी सुरू केली आहे. त्यासाठी देशपातळीवर जो कार्यक्रम आखून दिलेला आहे. तो राबविला जात आहे. केंद्रीय मंत्री अजयकृमार मिश्रा हे २०,२१,२२ जुलै रोजी मतदार संघात येऊन बैठक घेणार आहे. त्यामुळे यापुढे हा मतदासंघ भाजपा चाच असेल असे श्री शेलार त्यांनी म्हटले आहे.

भाजपनं लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मिशन ४५ हाती घेतलं आहे. याबाबतची सर्व माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्या जागा जिंकल्या आहेत. त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र, ज्या जागा जिंकायच्या आहेत. त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याचं फडणवीस म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलारांकडे देण्यात आली असून सध्या या ठिकाणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत पहायला मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular