27.4 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriपावसाळ्यात मृत्यू नको रे बाबा, असे “या” गावातील ग्रामस्थांचे म्हणणे

पावसाळ्यात मृत्यू नको रे बाबा, असे “या” गावातील ग्रामस्थांचे म्हणणे

अनेक वर्षे येथील ग्रामस्थ या नाल्यावर साकव बांधण्याची मागणी करीत आहेत; परंतु तांत्रिक कारणांमुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे

सध्या पावसाळा सुरु असल्याने आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर मागील ३-४ दिवस सतत संततधार सुरु असल्याने, नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पण अशा पाण्याच्या अतिरिक्त पणा मुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू पावसाळ्यात झाला तर ग्रामस्थांसाठी हि अंत्ययात्रा प्रचंड शारीरिक यातना देणारी ठरते. शासकीय स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास नाल्यातून करावा लागत असल्याने, जीव मुठीत घेऊन हा पल्ला पार पडावा लागतो.

अनेक वर्षे येथील ग्रामस्थ या नाल्यावर साकव बांधण्याची मागणी करीत आहेत; परंतु तांत्रिक कारणांमुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. वरवेली तेलीवाडीचे स्मशान एका नाल्याच्या पलीकडे आहे. शासनाने लोकांच्या सोयीकरिता या ठिकाणी चौथरा, पत्र्याची शेड असा खर्चही केला आहे. पावसाळ्यात धोकादायक नाला पार करावा लागू नये तसेच पावसानंतरही नाल्यातील दगडधोंड्यातून जाण्याचा त्रास वाचावा म्हणून कायमस्वरूपी साकव किंवा  छोटा पूल बांधावा,  अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करत आहेत.

मात्र स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटेची नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरी केलेली नाही. ही पायवाट खासगी जागेतून आहे. तसेच, हा नाला बारमाही वाहत नाही. जून, जुलैमधील पावसाचा जोर ओसरला की नाला सहजगत्या पार करता येतो. त्यामुळे शासन अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

दरवर्षी पावसाळ्याचे चार महिने या स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागते. नाल्याच्या वेगवान प्रवाहातून कंबरभर पाण्यातून पलीकडे जावे लागते. मुसळधार पाऊस असेल, नाल्याचा प्रवाह धोकादायक असेल तर काहीवेळा अंत्ययात्रेसाठी पाऊस कमी होऊन, पाणी ओसरण्याची देखील वाट पाहावी लागते. अशावेळी वाडीतील सर्वच व्यवहार ठप्प होतात.

मृतांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा खोळंबा होतो. त्यामुळे पावसाळ्यात मृत्यू नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर येते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण आलो तरी ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सोयी सुविधांकरिता खस्ता खाव्या लागत आहेत. स्मशानभूमीच्या जागेवर शासनाचा अधिकार आहे. दुसऱ्या बाजूला साकव किंवा पुलावर चढण्यासाठी आवश्यक जागा देण्यास मालक तयार आहे. तरीही ही मागणी पूर्ण होत नाही, हे दुर्दैव आहे. जीवनाच्या अखेरीला सुद्धा अशा यातना भोगाव्या लागतात आहेत हे दुर्दैवच म्हणावं लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular