28.2 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeEntertainmentअपरिचित फेम विक्रमच्या तब्येतीबाबत त्याचाच प्रत्यक्ष खुलासा

अपरिचित फेम विक्रमच्या तब्येतीबाबत त्याचाच प्रत्यक्ष खुलासा

विक्रमने आपल्या विषयी हार्ट अटॅकच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. ही घटना त्याच्या आगामी ‘पोन्नियन सेल्वन’ या सिनेमाच्या टीजर लॉंच व्हायला काही तास उरले असतानाच घडली. त्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरली की, विक्रमला हृद्यविकाराचा झटका आल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये  दाखल केलं गेल.

आता या सगळया अफवांवरील पडदा उठवण्यासाठी विक्रमने समोर येऊन आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. विक्रम म्हणाला, सोमवारी ११ जुलै रोजी, माझ्या आगामी ‘कोबरा’ सिनेमाच्या ऑडियो लॉंच दिवशी मी प्रकृती संदर्भात तक्रार करीत म्हटलं होतं की, थोडं अस्वस्थ वाटत आहे आणि त्यानंतर मी तपासणीसाठी स्वत: हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. पण त्यानंतर माहित नाही काय झालं माझ्या प्रकृती संदर्भात अफवांचा महापूरच आला.

पण मी सांगू इच्छितो कि, मी एकदम उत्तम आहे आणि जेव्हा तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात तेव्हा मला कस काय होईल. माझं कुटुंब, मित्रपरिवार, चाहते सगळे माझ्यासोबत आहेत”. त्यानंतर हॉस्पिटलचे प्रवक्ता आणि विक्रमचे मॅनेजर सूर्यनारायणन एम यांनी या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याच म्हटलं होतं. विक्रमने आपल्या विषयी हार्ट अटॅकच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, ‘त्याच्या तब्येती संदर्भात खूप अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर मी पाहिलं, कुणीतरी एका आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर माझा फोटो मॉर्फ करत तो व्हायरल करण्यात आला होता. परंतु, अशामुळे माझे चाहते मात्र उगीचच चिंताग्रस्त झाले”.

पुढे बोलताना विक्रम म्हणाला,” आता मला माझा हात माझ्या छातीवर देखील ठेवायला नको, नाहीतर लोक लगेच दावा करतील मला हार्टअटॅक आला आहे. मी याचा अंदाजा नक्कीच लावू शकतो की उदया माझ्या तब्येती संदर्भात काय हेडलाईन असेल.

RELATED ARTICLES

Most Popular