26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeInternationalसमुद्रकिनाऱ्यावरील “त्या” व्हायरल व्हिडियोचे सत्य अखेर समोर

समुद्रकिनाऱ्यावरील “त्या” व्हायरल व्हिडियोचे सत्य अखेर समोर

रविवारी १२ जुलै रोजी वडील आणि दोन मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

सोशल मिडीयावर सध्या एक समुद्रकिनारी पर्यटक दंग मस्ती करतानाचा व्हिडियो व्हायरल झालेला दिसून येत आहे. लाटांशी खेळताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमध्ये काही पर्यटक वाहून गेल्याचे सपशेल त्या व्हिडियो मध्ये दिसून येत आहे. आधी तो व्हिडियो अलिबाग मधील असल्याचे म्हटले जात होते परंतु, सत्य अखेर समोर आले आहे.

सांगलीतील तीन जण ओमान  देशातील समुद्रात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. समुद्रात बेपत्ता झालेले तीन जण हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रहिवासी असून, अभियंता शशिकांत म्हमाणे आणि त्यांची दोन मुले ओमानमधील लाटांच्या तडाख्यात वाहून गेले. या घटनेमुळे जतमध्ये शोककळा पसरली आहे.

रविवारी १२ जुलै रोजी वडील आणि दोन मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.

शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी यांच्यासह दुबई येथे वास्तव्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबईजवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

मग ते ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले, तिथे प्रचंड लाटा होत्या. त्याचा व्हिडीओ शूट करतानाच मोठी लाट आली आणि त्यात काही जण ओढले गेले. त्यावेळी ही घटना घडली. या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे समुद्रात बेपत्ता झाले. तर त्यांच्या पत्नी सारिका आणि एका मुलीची सुटका करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular