26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriबनावट दागिने ठेवून, संगनमताने बँकेची लाखो रुपयांची फसवणूक

बनावट दागिने ठेवून, संगनमताने बँकेची लाखो रुपयांची फसवणूक

फसवणूकीची ही घटना २१ जानेवारी २०१९ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत घडली आहे.

रत्नागिरी शहरा नजीकच्या कारवांचीवाडी येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून एकूण संगनमताने बँकेची सुमारे २२ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच संशयितांपैकी बँकेच्या रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनारासह अन्य तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून एक संशयित सध्या फरार आहे. फसवणूकीची ही घटना २१ जानेवारी २०१९ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत घडली आहे. संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडीमध्ये केली आहे.

या संशयितांमध्ये प्रदीप श्रीपाद सागवेकर वय ५१, रा. किर्तीनगर, रत्नागिरी, आकाशानी जनार्दन कांबळे वय ५०, शुभम जनार्दन कांबळे वय २४, दोन्ही रा. रविंद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी, जयवंत सखाराम मयेकर वय ४९, रा.पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी,रत्नागिरी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर त्या पाच पैकी सलीम हुसेन निंबल रा.कोकणनगर,रत्नागिरी हा फरार असून याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्याविरोधात गुरुवार २१ जुलै २०२२ रोजी शाखा व्यवस्थापक अमिता राजेश झगडे वय ३६, रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी यांनी तक्रार दिली आहे.

त्यानूसार,प्रदीप सागवेकर हा या बँकेत गेली १८ वर्षांपासून रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनार म्हणून काम करत आहे. त्याने सलीम निंबल,आकाशानी कांबळे,शुभम कांबळे, जयवंत मयेकर यांच्याकडील दागिने हे बनावट असल्याचे माहित असूनही ते सोन्याचे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले. त्याआधारे संशयितांनी संगनमताने बँकेतून एकूण २२ लाख ८० हजार ५०० रुपयांचे कर्ज घेउन फसवणूक केली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात तक्रार देताच त्यांनी २१ व २२ जुलै रोजी या चार संशयितांना अटक करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular