30.3 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeIndiaगुगल मॅपने घेतला यु-टर्न, बदललेल्या शहरांची नावे जैसे थे

गुगल मॅपने घेतला यु-टर्न, बदललेल्या शहरांची नावे जैसे थे

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने सत्तांतर होण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता.

काही दिवसांपूर्वी गुगल मॅपने काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलले होते. गुगल मॅपमध्ये औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव असे केले होते. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने सत्तांतर होण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील काही प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती. मॅपवर औरंगाबाद असे शोधल्यानंतर संभाजीनगर असे आपोआप रिझल्ट येऊ लागले होते. मात्र आता गुगलने यु-टर्न घेतला असून पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद असे नाव कायम ठेवले आहे. तर धाराशिवचे उस्मानाबाद केले आहे.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी ट्वीट करून माझ्या शहराचे नाव बदलणारे तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित केला होता. तर, गुगलवर संभाजीनगर विरोधात व औरंगाबाद समर्थनार्थ तक्रारींचा पाऊस पडत होता. एक प्रकारे संभाजीनागरच्या विरोधात असलेल्या गटाकडून गुगलवर मोहीमच सुरू करण्यात आली होती. तक्रार कशी करायची या बाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. मात्र या तक्रारींमुळेच गुगल नेच यू टर्न घेतल्याची चर्चा आहे.

शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं नामकरण करण्यात आलं. यानंतर १९ जुलैपासून गुगलच्या उत्पादनांवर बदलेली नावं दिसून लागली होती. यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेकांनी या अनपेक्षित बदलावर आक्षेप नोंदवला होता.

मोबाइलवर औरंगाबादऐवजी संभाजीनगर दिसताच, अनेकांनी या निर्णयाबाबत अनेकांनी गुगलच्या साइटवर आक्षेप नोंदवला होता. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुगलला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता. औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर असल्याचं गुगलला कळवण्यात आलं होतं. गुगलने देखील त्वरित माघार घेऊन जी आधीची नवे होती त्याप्रमाणेच ठेवली आहेत. तसेच आक्षेप घेणाऱ्यांनी न्यायालयाचा १९९६ चा निकालही सोबत जोडून आक्षेप नोंदविला होता. आता गुगलवरील नावात पुन्हा बदलाबाबत काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular