26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeMaharashtraश्रावण मासारंभी, फळ भाज्यांचे दर गगनाला भिडले

श्रावण मासारंभी, फळ भाज्यांचे दर गगनाला भिडले

भाज्यांच्या वाढलेल्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून दरवाढ करण्यात आली असून किरकोळ बाजारात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे.

श्रावण महिना म्हणजे सर्व सणवाराला सुरुवात होते. पूजा पाठ, मंदिरांमध्ये या महिन्यात विशेष होम हवन केले जाते. आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण महिना शाकाहार अनेक जण करतात. त्यामुळे या महिन्यात विशेष करून फळ आणि भाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आहे. भाज्यांच्या वाढलेल्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून दरवाढ करण्यात आली असून किरकोळ बाजारात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे.

 किरकोळ बाजारात भाज्यांची ४० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे तर फळांचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे विशेषत: पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या रानभाज्याचे दर सुद्धा चढेच आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही किरकोळ व्यापाऱ्यांनी साठवणूक केलेल्या भाज्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे मागणी वाढली असताना बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

भाज्यांची बाजारात विक्रीसाठी वाहतूक करत असताना सुद्धा आर्थिक फटका बसत आहे. इंधनाचे दर सुद्धा आधीपासूनच वाढीव असल्याने वाहतूक खर्चात यापूर्वीच वाढ झाली आहे. राज्यातील बहुतकरून सर्वच महामार्गांना तसेच अंतर्गत रस्त्यांना सुद्धा खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळेही वाहतूक खर्च सतत वाढत असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला पहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे श्रावण महिना सुरू झाल्याने खवय्ये रान भाज्यांना अधिक पसंती देत आहेत. वाढत्या मानवी जंगलावरील अतिक्रमणांनी रानभाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मात्र गगनाला भिडले  आहेत, असे आदिवासी विक्रेत्याचे मत आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी तर किरकोळ बाजारात ४० टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवडा या भाज्यांचे दर थेट शेकडापार पोहोचलेले दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular