27.5 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

TVS Raider आणि Hero Xtreme-125R सोबत स्पर्धा

Bajaj Pulsar N125 भारतात लॉन्च होण्यापूर्वीच समोर...

भारताची ४६ धावांत दाणादाण, प्रथम फलंदाजीचा निर्णय अंगलट

या अगोदरच्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत षटकामागे ८.२२ च्या...

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ज्येष्ठ बंगाली अभिनेते आणि लोकप्रिय वाचक देवराज...
HomeLifestyleकोरोना प्रतिबंधित लसींचा महिलांच्या आरोग्यावर असाही परिणाम!

कोरोना प्रतिबंधित लसींचा महिलांच्या आरोग्यावर असाही परिणाम!

लसीनंतर ४२% महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान अधिक रक्तस्त्राव झाला आहे.

जगभरातील अनेक महिलांना कोरोनाविरूद्ध लस मिळाल्यानंतर असामान्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. हे बदल त्याच्या पीरियड सायकलमध्ये आले आहेत. जर्नल सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनानुसार, लसीनंतर ४२% महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान अधिक रक्तस्त्राव झाला आहे.

तीन महिन्यांच्या या संशोधनात ३९ हजार प्रौढांचा समावेश करण्यात आला. या सर्वांनी लसीचे दोन डोस घेतले होते आणि त्यापैकी कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. संशोधकांनी त्यांना मासिक पाळीशी संबंधित बदल जसे की पीरियड फ्लो, सायकल कालावधी, रक्तस्त्राव कालावधी आणि सामान्य लक्षणे याकडे लक्ष देण्यास सांगितले. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की ४२% लोक ज्यांना पूर्वी नियमित मासिक पाळी येत होती, त्यांना पूर्वीपेक्षा जास्त रक्तस्त्राव सुरु झाला आहे.

त्याच वेळी, ४४ % लोक होते ज्यांचा पाळीच्या कालावधी प्रवाह बदलला नाही. काही मोजकेच लोक होते ज्यांचा पूर्वीपेक्षा कमी होता. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे आश्चर्यकारक होते की ज्या महिलांची मासिक पाळी थांबवली होती म्हणजेच रजोनिवृत्ती किंवा ज्यांनी मासिक पाळी थांबवण्यासाठी हार्मोन्स किंवा औषधांचा वापर केला होता, त्यांनाही कोरोनाची लस मिळाल्यानंतर रक्तस्त्राव होऊ लागला. या संशोधनात सहभागी असलेल्या संशोधक कॅथरीन ली आणि केट क्लॅन्सी यांनी सांगितले की, लसीमुळे मासिक पाळीच्या असामान्य समस्यांमुळे लोकांची चिंता वाढू शकते. यामुळे त्यांना शारीरिक त्रासासोबतच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोसांमुळे महिलांच्या शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू लागले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular