23.9 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeChiplunचिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

चिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत चिपळूण तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. खेर्डी येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट निवडली. यामुळे तालुक्यात काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. या तीन वरिष्ठ नेत्यांसह काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या माजी युवती जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे उपशहर अध्यक्ष मुख्तार पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश २८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत होणार होता. मात्र, अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील दुर्दैवी निधनामुळे मुख्यमंत्री दौरा तसेच सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा खेर्डीतच पार पडला. यादव पक्षप्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना भाजप नेते प्रशांत म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक व्यक्तींशी माझे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही एकत्र काम केलेले आहे. त्यामुळे हा प्रवेश केवळ औपचारिक नसून आपुलकीचा आणि विश्वासाचा आहे. ते पुढे म्हणाले, मी कार्यकर्त्यांसाठी भाजपमध्ये आलो आहे. त्यांना पुढे घेऊन जाणे हेच माझे ध्येय आहे.

प्रवेश करताना माझ्याही मनात काही संभ्रम होता. पण पक्षात आल्यानंतर सर्व शंका दूर झाल्या. भाजपमध्ये सक्षम नेतृत्वाला नेहमीच पाठबळ दिले जाते, टीमवर्कचे उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळते. आपल्या ताकदीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे पक्षात न्याय, सन्मान आणि मानाची वागणूक नक्कीच मिळेल. असे सांगत यावेळी प्रशांत यादव यांनी सर्वांनी एकत्र येऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्नां यादव, रुपाली दांडेकर, उपनगराध्यक्षा तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष व नगरपालिकेतील भाजप गटनेते शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, तसेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular