25.5 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriहर घर तिरंगा अभियानात, रत्नागिरीतील सर्व हॉटेल व्यावसायिकांचा उस्फुर्त सहभाग

हर घर तिरंगा अभियानात, रत्नागिरीतील सर्व हॉटेल व्यावसायिकांचा उस्फुर्त सहभाग

प्रत्येक हॉटेलवर तीन दिवस तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावण्यात येणार आहे.

देशभरातून भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबाबत अमृत महोत्सवी वर्ष म्हणून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे पूर्ण उत्साहात आणि जल्लोषाने प्रत्येक भारतीय या अभियानामध्ये सहभागी होत आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारने आयोजित केलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या आयोजनात रत्नागिरीतील सर्व हॉटेल व्यावसायिक उत्साहाने सहभागी होणार आहेत. विविध प्रकारे राष्ट्रध्वज तिरंगा सन्मान अभियान राबवणार आहेत. त्यामध्ये सर्व हॉटेल व्यावसायिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी हॉटेल लॅंडमार्क येथे झालेल्या बैठकीत केले.

घरोघरी तिरंगा अभियानाकरिता रत्नागिरीतील हॉटेल्स असोसिएशन यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. रत्नागिरीतील सर्व हॉटेल्स व्यावसायिक येत्या १३ ते १५ ऑगस्टला आयोजित केलेल्या तिरंगा सन्मान सोहळ्यात उत्साहाने सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष रमेश कीर यांनी दिली आहे.

प्रत्येक हॉटेलवर तीन दिवस तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावण्यात येणार आहे. तसेच तिन्ही दिवशी हॉटेलवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये तिरंग्यातील विविध रंगांच्या फुग्यांची सुंदर आरास करावी. शक्यतो कर्मचाऱ्यांना घरी लावण्यासाठी तिरंगा ध्वज द्यावा, अशा सूचना कीर यांनी दिल्या. या सभेला सचिव सुनील देसाई, उपाध्यक्ष उदय लोध, कौस्तुभ सावंत, महेश सावंत, गणेश धुरी, प्रकाश संसारे, सुहास ठाकूरदेसाई, विवेक शानभाग, देसाई यांनी सभेत विचार व्यक्त केले. तसेच सर्वांनी हा उपक्रम चांगल्याप्रकारे साजरा करून शासनाला सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षी अनेक सोयी सुविधा विविध क्षेत्रात देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular