27.8 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

एलआयसी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

रत्नागिरीतील एलआयसी कार्यालयाबाहेर एलआयसी विमा प्रतिनिधी आणि...

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...
HomeRatnagiriपोषण आहारातील निकृष्टपणा प्रकरणात, ठेकेदाराला नोटीस

पोषण आहारातील निकृष्टपणा प्रकरणात, ठेकेदाराला नोटीस

काही शाळांमध्ये पोषण आहार नित्कृष्ठ आढळून आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीसा बजावण्यात आल्या असून, तीन नोटीस दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाणार आहे.

रत्नागिरीमधील प्रसिद्ध शाळेमध्ये झालेल्या पोषण आहारातील निकृष्ठपणाच्या आणि अनियमितपणामुळे ठेकेदार आणि संस्था चालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे काही शाळांमध्ये पोषण आहार नित्कृष्ठ आढळून आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीसा बजावण्यात आल्या असून, तीन नोटीस दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाणार आहे. त्याच बरोबर या संपूर्ण टेंडर प्रकियेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, येथील शिर्के प्रशाला, दामले हायस्कूल मध्ये पोषण आहारात निकृष्ठ दर्जा आणि अनियमितता आढळून आली इतकेच नव्हे तर कच्चा पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी एक प्रकारे खेळण्यात आले. सलग तिसर्‍या दिवशीही पोषण आहार व्यवस्थित आला नव्हता. पाण्यासारखी आमटी आणि मऊ भात विद्यार्थ्यांना दिला गेला, शाळांकडूनही तक्रारी अहवाल मागवण्यात आले आहेत, त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असेल तर योग्य निर्णय घेण्यात येईल, ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

ज्या संस्थेला टेंडर मिळाले आहे त्या तीनही संस्था जिल्हाबाहेरील असून यामध्ये स्थानिक बचतगटांना  प्राधान्य देण्यात आले नाही, निविदेच्या वेळी डिपॉझिटची रक्कम अधिक असल्याने स्थानिक बचतगटाला ही रक्कम भरता आली नाही. परंतु त्यानंतर डिपॉझिटची रक्कम कमी केल्याची माहिती समोर आली आहे. ही टेंडर विभागून देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा सर्वशिक्षण विभाग व  नगर परिषदेला देणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular