27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeEntertainment'मी पैशासाठी माझा दर्जा कमी करत नाही' बिग बॉस ४ सहभागाबाबत केतकीची...

‘मी पैशासाठी माझा दर्जा कमी करत नाही’ बिग बॉस ४ सहभागाबाबत केतकीची प्रतिक्रिया

अभिनेत्रीने शोच्या संकल्पनेवर टीका केली. तसेच या शोमध्ये सहभागी होऊन स्वतःचा दर्जा कमी करून न घेण्याबद्दलही ती यावेळी बोलली.

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु आहे. याबाबत केतकीला जेव्हा बिग बॉस मराठी ४ मधील तिच्या सहभागाबद्दल विचारले जाते यावर ती म्हणाली की, ‘ज्यांनी ज्यांनी मला आतापर्यंत बिग बॉसच्या सहभागाबद्दल ज्यांनी ज्यांनी विचारले त्यांनी १ रुपया जरी यासोबत दान केला असता तर, आतापर्यंत तिच्या संबंधित आजार एपिलेप्सी संशोधनासाठी कर्मचाऱ्यांसह अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. तसेच बिग बॉस संदर्भात माझे नाव छापल्यावर प्रत्येकवेळी १ हजार रुपये दान करावेत.’ केतकी चितळे मागील सीझनमध्येही सहभागी होईल अशी अफवा पसरली होती.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकी चितळे ४१ दिवस जेलमध्ये होती. अटके दरम्यान अभिनेत्रीने नेसलेल्या साडीवर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. शाईफेक झाल्याने खराब झालेल्या ब्लाऊजवर आता अभिनेत्रीने कलाकुसर करत त्यावरील शाई झाकत निळ्या आणि केशरी रंगांचा वापर करत रंगकाम केले आहे. अभिनेत्रीने या पांढऱ्या ब्लाऊजवर त्रिशूळ असणारी डिझाइन बनवली आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या शोचा टीझर रिलीज झाला असून अभिनेत्री केतकी चितळे हिच्या आगामी सीझनमध्ये सहभागी होण्याबाबतही चर्चा केली जात होती. असं असलं तरी केतकीने आतापर्यंतच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. तिच्या नवीन सोशल मीडिया पोस्टमध्ये, अभिनेत्रीने शोच्या संकल्पनेवर टीका केली. तसेच या शोमध्ये सहभागी होऊन स्वतःचा दर्जा कमी करून न घेण्याबद्दलही ती यावेळी बोलली.

केतकीने लिहिले, ‘वर्षाचा तो काळ पुन्हा आला आहे, जेव्हा मला प्रत्येक वर्षाप्रमाणे सांगायचं असतं की मी फक्त नकारात्मकता पसरवणाऱ्या बिग बॉससारख्या कार्यक्रमाला अजिबात प्रोत्साहन देत नाही. म्हणून अशा दयनीय मानवी प्रयोगात भाग घेणे माझा दर्जा कमी करण्यासारखे आहे. आणि मी पैशासाठी माझा दर्जा कधीच कमी करणार नाही.’

RELATED ARTICLES

Most Popular