25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunचिपळूण पालिकेच्या दोन्ही धोकादायक इमारतीची तात्पुरती दुरुस्ती

चिपळूण पालिकेच्या दोन्ही धोकादायक इमारतीची तात्पुरती दुरुस्ती

दोन्ही इमारती आता जून्या झाल्या असल्याने तेथे काम करणे अतिशय धोक्याचे बनले आहे.

चिपळूण पालिकेच्या जुनी आणि नवीन अशा दोन्ही इमारती धोकादायक झाल्या आहेत. प्रशासन पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जुन्या इमारतीची तात्पुरती दुरुस्ती आणि रंगरंगोटी करत आहे. त्यासाठी २१ लाखाचा खर्च पालिका करणार येत असल्याची माहिती मिळाली आहे.

चिपळूणमधील पालिकेच्या दोन इमारती आहेत. यातील एक इमारत ५० वर्षापूर्वी तर दुसरी इमारत १९९७ मध्ये बांधण्यात आली. दोन्ही इमारती आता जून्या झाल्या असल्याने तेथे काम करणे अतिशय धोक्याचे बनले आहे. इमारतीला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असणारा लाकडी जीना देखील मोडकळीस आला आहे. तो कोणत्याही वेळी कोसळण्याची भिती आहे. त्यामुळे पालिकेत काम करणारे कर्मचारी व अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.

दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही पालिका इमारतीमध्ये वावरताना भिती वाटत आहे. मध्यंतरी इमारतीचा काही भाग ढासळला होता. त्यामुळे भविष्यात कधीही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी पालिकेचे कामकाज इतर इमारतींमध्ये हलवण्याची मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या इमारतींचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.

या दोन्ही इमारती स्ट्रक्टरल ऑडिटमध्ये धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले तरीही पालिकेचा कारभार इतर ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे होते असताना देखील तसे न करता जुन्या इमारतींची तात्पुरती दुरुस्ती करून प्रशासनाचा कामकाज जैसे थेच सुरू आहे. मागील सभागृहाने इमारतीची तात्पुरती दुरुस्ती करण्याचा ठराव केला होता. प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करत निविदा प्रक्रिया राबवली आणि इमारतीची तात्पुरती डागडुजी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular