26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरीमधील “या” गावाला मिळाला सुंदर गाव पुरस्कार

रत्नागिरीमधील “या” गावाला मिळाला सुंदर गाव पुरस्कार

यावेळी मिळालेला हा पुरस्कार कुरधुंडा गावातील प्रत्येक नागरिकांच्या आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यदिनी संगमेश्वर मधील कुरधुंडा ग्रामपंचायतीने केलेल्या अभूतपूर्व कार्यामुळे गावाला विशेष पुरस्कार प्राप्त झाला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतने, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारामध्ये बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला असून या पुरस्काराचे १० लाखाचे मानकरी ठरले आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्रचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी शिंदे आणि संबंधित अधिकारी यांच्या हस्ते सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे देण्यात आला.

या मिळालेल्या सन्मानामुळे कुरधुंडा ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले जात आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी यामध्ये सहभाग नोंदवला होता, त्या सर्व ग्रामपंचायतीमधून कुरधुंडा ग्रामपंचायतने आपला मानाचा तुरा उंचावला. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनी या पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सरपंच सबा अलजी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मिळालेला हा पुरस्कार कुरधुंडा गावातील प्रत्येक नागरिकांच्या आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या सहकार्यामुळे मिळाला असल्याचे सांगितले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच सबा अलजी, उपसरपंच तैमूर अलजी, ग्रामपंचायत सदस्य जमूरत अलजी, नाजीमा बांगी, जेष्ठ नागरिक अब्दुल्ला मालगुंडकर, अब्दुल्ला फकीर, समद मालगुंडकर, ग्रामसेवक श्रेया भाईजे, शाहिस्ता अलजी, तंटामुक्ती अध्यक्ष उमर अलजी, महमद अलजी, उस्मान मालगुंडकर, ग्रामसेवक रोशन जाधव,तरन्नूम अलजी,सलाम अलजी,हुसैन अलजी,एजाज अलजी, हुसैनमिया मालगुंडकर, मुनीर अलजी, सुरेश खापरे, आनंद खापरे, अविनाश लिंगायत, दीपक डावल, सुधीर पाताडे, दिनेश निंगवले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular