26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriराऊतांनी घाटेखाली उभे राहून, मी कुणा कुणाला पैसे दिले हे जाहीर करावे

राऊतांनी घाटेखाली उभे राहून, मी कुणा कुणाला पैसे दिले हे जाहीर करावे

मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न केला होता,असा खळबळजनक आरोप विनायक राऊतांनी केला.

ठाकरे सरकार संपुष्टात येऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यावर दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आता पुन्हा मंत्री उदय सामंत त्यांच्यावर तोंडसुख घेऊन आरोप केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले कि, मंत्री उदय सामंत यांनी पालीमध्ये बसून शिवसेना फोडायचा प्रयत्न केला होता,असा खळबळजनक आरोप विनायक राऊतांनी केला. वेळ आल्यावर मी सगळ्याच गोष्टी बाहेर काढेन, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

विनायक राऊतांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न कोकणात या आधीच झाला होता. पालीमध्ये बसून शिवसेनेचे वैभव नाईक यांना पाडण्यासाठी भाजप नेते नारायण राणे यांचे समर्थक उमेदवार यांना रसद पुरवण्यात आली होती.

विनायक राऊत यांनी वैभव नाईकांना पाडण्यासाठी राणेंच्या उमेदवाराला ५०  लाख रुपये देण्यात आले होते”, असा गंभीर आरोप केला आहे. “शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे उमेदवार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी नारायण राणेंचे त्यावेळचे उमेदवार यांना ५० लाख रुपये देऊन पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमच्याच पक्षातील एका नेत्याने हे कृत्य केलं होतं, असा घणाघाती आरोप करत उदय सामंत यांना खासदार विनायक राऊत यांनी लक्ष केले.

खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत मंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे  उदय सामंत यानी या सगळ्या गोष्टींची किव करावीशी वाटतेय, अशी प्रतिक्रिया दिली. हे केवळ मला बदनाम करण्याचं काम सुरु आहे. मदत म्हणजे नेमकं कोणाला केली? विनायक राऊत हे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रात पुढे गेलेली व्यक्ती आहे ते जर खरोखर अध्यात्मिक क्षेत्रात असतील तर सिंधुदुर्गात म्हटले जाते देवळात घाटेखाली उभे राहून सांगितलं की ते खरं असतं तर माझे विनायक राऊत यांचा आव्हान आहे की त्यांनी घाटेखाली उभे राहून मी कुणा कुणाला पैसे दिले हे जाहीर करावे. त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध केलं तर मी कधीही समोर यायला तयार आहे. अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली

RELATED ARTICLES

Most Popular