28.5 C
Ratnagiri
Sunday, September 7, 2025
HomeRajapurअखेर रायपाटण नं. १ या प्राथमिक शाळेचा रस्ता मोकळा, महसूल विभागाचे सहकार्य

अखेर रायपाटण नं. १ या प्राथमिक शाळेचा रस्ता मोकळा, महसूल विभागाचे सहकार्य

लगतच्या जमीन मालकांनी शाळेच्या जागेवर हक्क शाबीत करण्यासाठी न्यायालयात दिवाणी दावा ठोकला होता.

राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रायपाटण नं. १ या प्राथमिक शाळेच्या रस्त्यात कुंपण घालून केलेला अडथळा अखेर प्रांताधिकारी यांच्या आदेशानंतर पोलीस बंदोबस्तात दूर करण्यात आला आहे. गेले तीन चार वर्षे बंद असलेला शाळेचा मार्ग मोकळा करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रांताधिकारी वैशाली माने, तसेच नायब तहसिलदार दिपाली पंडित व महसूल विभागाला धन्यवाद दिले आहेत.

रायपाटण नं. १ प्राथमिक शाळा ही सन १८९३ मधील शाळा असून सध्या अस्तित्वात असलेल्या शाळेची इमारत १९५४ साली बांधण्यात आलेली आहे. शाळेची इमारत जुनी असल्यामुळे जि.प.ने तेथे दोन नवीन आरसीसी खोल्या मंजूर केल्या. या खोल्यांचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले आणि लगतच्या जमीन मालकांनी शाळेच्या जागेवर हक्क शाबीत करण्यासाठी न्यायालयात दिवाणी दावा ठोकला होता. परंतु हा दावा करताना शाळा ही जि.प.ची मालमत्ता असताना जिल्हा परिषदेला प्रतिवादी केलेच नव्हते. त्यामुळे हा विषय दिशाहीनच राहिला.

परंतु, शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात कुंपण घातल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाला सुद्धा अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे लवकरात लवकर यावर मार्ग काढण्यात यावा याकरिता ग्रामस्थानी महसूल विभागाकडे सहकार्य मागितले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना सहन करावा लागणारा त्रास संपेल आणि रस्त्याच्या मधील कुंपणाची अडचण नाहीशी होईल. अखेर, महसूल विभागाने या विषयाची गंभीर दाखल घेऊन त्या जागेचे सर्वेक्षण करून त्या जागेबद्दल न्यायनिवाडा करण्याचे नियोजले. आणि शाळेच्या रस्त्यात घालण्यात आलेल्या कुंपणाला पोलीस बंदोबस्तात तोडून संपूर्ण रस्ता शाळेसाठी मोकळा करून दिला.

RELATED ARTICLES

Most Popular