27.6 C
Ratnagiri
Tuesday, September 9, 2025

वैद्यकीय महाविद्यालयामुळे ३ वर्षांत रुग्णसेवेत चौपट वाढ : उदय सामंत

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा...

चिपळूण बसस्थानकाच्या कामाला नवी गती…

सहा-सात वर्षांपासून रखडलेल्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकाच्या कामाला...

करूळ घाट दुरुस्ती, त्या’ सहा दरडी पाडण्यास सुरुवात

करूळ घाटात कोसळलेली दरड हटविण्यात आली असून,...
HomeKokanचल राणी चंद्रावर जाऊ, राणी म्हणते त्यापेक्षा कोकणात जाऊ

चल राणी चंद्रावर जाऊ, राणी म्हणते त्यापेक्षा कोकणात जाऊ

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशभक्तांना मुंबई गोवा महामार्गांवरील खड्ड्यांतून रस्ता शोधून मार्गस्त व्हावे लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची इतकी वाईट अवस्था झाली आहे कि, एक व्हायरल व्हिडिओ पासून अनेक चाकरमान्यांना चंद्रावर फिरायला आल्याचा फील येत आहे असे अनेकांनी मत व्यक्त केलं असून “हा चंद्र नव्हे तर मुंबई-गोवा हायवे आहे” असे उपरोधाने सांगावे लागत आहे. अनेक कोकणातील मंत्री पदावर असून सुद्धा हायवेची अशी खिळखिळी अवस्था बघून चालकवर्ग स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळीवर तोंडसुख घेत आहेत.

एका ड्रायव्हरने आपली भावना पोटतिडकीने व्यक्त केली आहे, तो म्हणाला कि, खड्डेमय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे गाडीची तर वाट लागतेच, पण गाडीला जेवढा त्रास होतं नसेल तेवढा आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.

नेते मंडळी हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून ट्रेनने प्रवास करतात. पण त्यासाठी त्यांचा पैसा थोडीच जातो आहे?  उलट वारंवार उखडलेले खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट हे नेतेमंडळी घेतात आणि आपली तुंबडी भरतात. कोलाड, सावर्डेजवळ वाहन चालविताना चालकांना जीव नकोसा होतो. याबाबत कोणी तरी जबाबदारीने वागेल का?  असा थेट प्रश्न आता विचारला जात आहे.

कोकणातील गणेशोत्सवाचा सण आला की  दरवर्षी सरकार चार दिवस आधी खड्डे भरण्याचे आश्वासन देते, पण प्रत्यक्षात त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशभक्तांना मुंबई गोवा महामार्गांवरील खड्ड्यांतून रस्ता शोधून मार्गस्त व्हावे लागणार आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरून वाहन चालविणे अतिशय कठीण झाले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वारांवर जायबंदी होण्याची वेळ आली आहे. या महामागांवरून गाडी चालवणे म्हणजे मृत्यूच्या मार्गाने जाणे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर ठेपला असून पुढील आठवड्यापासून मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात दाखल व्हायला लागतील. आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे अशा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. संगमेश्‍वर ते बावनदी दरम्यान महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. संगमेश्‍वरातील सोनवी पुलावरून चालणेदेखील अवघड झाले आहे. मोठमोठे कंटेनर या पुलावरून जात असल्याने रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular