26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeMaharashtraसोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सोनाली यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गोव्यात भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली फोगाट यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. हरियाणातल्या आदमपूर जिल्ह्यातल्या हिसार मतदारसंघातून भाजपने फोगाट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यांच्यासमोर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांचं आव्हान होतं. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही त्यांचा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.

बिग बॉस १४ मध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री घेऊन प्रवेश केलेल्या सोनाली या अल्पावधीतच सोशल मिडीयामध्ये  लोकप्रिय झाल्या होत्या. सोनाली यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसह गोव्या दौऱ्यावर गेल्या होत्या. अंजुना येथील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले.

सोनाली यांची बहीण रमण यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘निधनाच्या आधी संध्याकाळी मला तिचा फोन आला होता. तिला व्हॉट्सअपवर बोलायचे होते. ती अस्वस्थ होती आणि सतत भीती वाटत असल्याचंही म्हणालेली. त्यानंतर तिने कॉल कट केला आणि पुन्हा फोन उचललाच नाही. आणि माझ्या बहिणीला कधीच हृदयविकाराचा त्रास नव्हता. ती एकदम फिट होती. त्यामुळे आम्ही सोनालीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

डॉक्टरांनी सोनालीचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले आहे, परंतु, माझ्या कुटुंबाला ही गोष्ट पटण्यातीलच नाही आहे, की तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिला असा कोणताही आजार अथवा त्रास नव्हता,’ असे रमण म्हणाल्या. शवविच्छेदन केल्यावर अहवाल येईल, यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण लक्षात येईल. त्यांच्या शरिरावर कोणत्याही प्रकरच्या जखमा किंवा खुणा नव्हत्या. पोलिसांनी सोनाली यांच्या निधनाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिसांना सध्या तरी यात कोणत्याही कटाची शक्यता वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular