32.3 C
Ratnagiri
Tuesday, April 30, 2024

मूल विक्री प्रकरणात गुहागरचे दांपत्य ताब्यात

बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश...

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची टीव्ही मालिकेत एंट्री

मागच्या वर्षी गणेशोत्सवात सोशल मीडियावर एक गाणं...
HomeMaharashtraखाते वाटपानंतर झाले बंगले वाटप पाहूया कोणाला कोणता बंगला दिला!

खाते वाटपानंतर झाले बंगले वाटप पाहूया कोणाला कोणता बंगला दिला!

अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व शिवसेनेशी त्यांनी केलेली गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांचं खातेवाटपही करण्यात आले आहे. आता या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला मिळाला आहे तर अब्दुल सत्तार यांना पन्हाळगड बंगला मिळाला आहे. मुनगंटीवार यांना पर्णकुटी बंगला मिळाला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची जोरदार निदर्शने पाहायला मिळत आहेत. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना गुवाहटी ट्रीप व शिवसेनेशी त्यांनी केलेली गद्दारी या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जात आहे.

विधानसभा अधिवेशन सुरु असतानाच सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना नक्की कोणाची आणि पक्षाचे चिन्ह यावरून लढाई सुरु आहे. मंगळवारी मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार उदय सामंत यांना मुक्तागिरी बंगला मिळाला आहे तर वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगला देण्यात आला आहे. मंत्री आणि त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यांची यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील- रॉयलस्टोन, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार –     पर्णकुटी, चंद्रकांत बच्चू पाटील – ब-१ सिंहगड, विजयकुमार कृष्णराव गावित – चित्रकुट, गिरीश दत्रात्रय महाजन -सेवासदन, गुलाबराव रघुनाथ पाटील–जेतवन, संजय राठोड   -शिवनेरी, सुरेश दगडू खाडे- ज्ञानेश्वरी, संदिपानराव आसाराम भुमरे- ब- रत्नसिंधु, उदय रविंद्र सामंत – मुक्तागिरी, रविंद्र दत्तात्र्य चव्हाण -अ-६ रायगड, अब्दुल सत्तार- ब -७ पन्हाळगड, दीपक वसंतराव केसरकर – रामटेक, अतुल मोरेश्वर सावे -अ-३ शिवगड, शंभूराज शिवाजीराव देसाई- ब-४ पावनगड, मंगल प्रभात लोढा – ब-५ विजयदुर्ग तर महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार यांना मात्र त्यांचे शासकीय घर सोडावे लागले नाही. कारण मलबार हिल येथील देवगिरी बंगला अजित पवार यांनाच देण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular