31.3 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriविधानपरिषदेत रामदास कदम यांच्या समावेशाचे संकेत

विधानपरिषदेत रामदास कदम यांच्या समावेशाचे संकेत

कोकणातील आपला शिवसेनेचा गट अधिक भक्कम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवश्यक ते बळ दिले जात आहे.

दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात काही नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान याच बैठकीत रामदास भाई कदम यांचा समावेश विधानपरिषदेत करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते अशी खास ओळख असलेले रामदासभाई कदम यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत विधानपरिषद सदस्यपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. राज्यपाल महोदयांकडे आता ही यादी गेल्यावर प्रत्यक्षात नियुक्त्या राजभवनकडुन जाहीर झाल्यास तेव्हा शिंदे फडणवीस सरकारचे विधानपरिषदेत बारा आमदारांचे संख्याबळ वाढणार आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील माजी मंत्री रामदासभाई कदम यांचा समावेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून कोकणातील आपला शिवसेनेचा गट अधिक भक्कम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवश्यक ते बळ दिले जात आहे. यापूर्वी मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गेले १२ वर्षे विधानपरिषद सदस्य होते.

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी मातोश्री कडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत नाराजगी व्यक्त केली होती. यानंतर अनिल परब यांना बळ देऊन दापोलीत रामदास कदम गटाचे पंख छाटण्यात आले होते. रामदास कदम गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांच्या जागी परब यांनी सूर्यकांत दळवी गटाला बळ देत तीन नव्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यामुळे रामदास कदम यांच्या गटातील कार्यकर्ते प्रचंड नाराज होते. अखेर रामदास कदम आणि योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले होते.

याच दरम्यान खेड जामगे येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ‘रामदासभाई तुमची सेकंड ईनिंग जोरदार सुरू करा’, असा सल्ला दिला होता. यावेळी उपस्थित असलेले शंभुराज देसाई, उदय सामंत यांनीही भाई सभागृहात परत या असा आग्रह केला होता. परंतु, उद्धव ठाकरे यांच्याकडुन त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नव्हती.

RELATED ARTICLES

Most Popular