23.9 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriअपघाती जखमींना 'कॅशलेस' उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

जखमींना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या ‘गोल्डेन अवर’मध्ये उपचारांचा खर्च अडसर ठरू नये, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे, तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचविणाऱ्या मदतनीसाला ‘राहवीर’ म्हणून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. योजना ही महत्त्वाकांक्षी लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. निर्णयामुळे अपघातग्रस्तांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातांची संख्या तसेच अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा सरकारचा ठोस प्रयत्न आहे. तातडीचे उपचार, नागरिकांना मदतीसाठी प्रोत्साहन आणि पीडित कुटुंबांना आर्थिक आधार या त्रिसूत्रीमुळे रस्ते सुरक्षेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला – तातडीने मदत करून रुग्णालयात पोहोचविणाऱ्या नागरिकाला सरकारकडून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार बक्षीस देण्यात येणार आहे. ‘राहवीर’ या संकल्पनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या या प्रोत्साहनामुळे अपघातस्थळी मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेमुळे रस्ते अपघातातील जखमी आणि त्यांच्या नातेवाइकांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular