23.9 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriअर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

अनेक ठिकाणी पक्षाकडून एकाहून अधिक इच्छुक रिंगणात उतरले आहेत

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीसाठी पक्षीय पातळीवर तसेच आघाडी युक्ती स्तरावर नियोजन सुरू करण्यात आले आहे. मतांची विभागणी टाळणे अधिकृत उमेदवार निश्चित करणे आणि बंडखोरी रोकने या प्रमुख उद्देशाने हे नियोजन केले जात आहे. त्यात कोण माघार घेणार आणि कोण मैदानात असणाऱ्या बाबत चर्चा आता रंगल्या आहेत. जिल्ह्याच्या विविध तालुक्यात विविध गटातून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अनेक ठिकाणी पक्षाकडून एकाहून अधिक इच्छुक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे आव्हान उभे राहिले आहे, यासाठी स्थानिक पातळी वर पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असून प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणाचा आढावा घेतला जात आहे.

उमेदवारांची लोकप्रियता सामाजिक समतोल कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मागील निवडणुकांचे निकाल यांनी कशावर चर्चा होत आहे. अर्ज माघारी साठी इच्छुक उमेदवार यांची समजूत काढण्यात विशेष भर देण्यात येत आहे. काही ठिकाणी पद जबाबदारी किंवा भविष्यातील संधी देण्याचे आश्वासन देत बंडखोर उम दवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तरीही ज्या इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे नकार देत निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. दरम्यान उमेदवारांम ध्ये ही हालचाली वाढल्या असून माघार घ्यावी की निवडणूक लढवावी याबाबत समर्थकांची चर्चा केली जात आहे. काही ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्ज माघारीची अंतिम तारीख जवळ येत असताना वीत तालुक्याच्या राजकारणात चांगली चुरस निर्माण झाली आहे. अर्ज माघारी नंतर तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार असून खरी निवडणूक रणधुमाळी त्यानंतरच सुरू होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular