26.6 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriगणेशोत्सवाच्या उत्सवासाठी बाजारपेठ सज्ज

गणेशोत्सवाच्या उत्सवासाठी बाजारपेठ सज्ज

चायना माळांपेक्षा स्वदेशी माळांचे दर अधिक असले तरी चायना माल खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय अल्प आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी बाजारपेठ सजावटीच्या वस्तूंनी सजली आहे. प्लास्टिकबंदी असल्याने कागदी, क्रेपपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानाच्या वेली, विविध लाईटिंगची तोरणे उपलब्ध आहेत. लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी आदी विविध रंगाच्या फुलाच्या माळा तसेच हिरव्या वेलीसारख्या माळा ग्राहकांकडून खरेदीसाठी विशेष झुंबड उडत आहे. ५० रुपयापासून ते २५० रुपयांपर्यंत माळांचे दर लावण्यात येत आहेत.

वर्षातून एकदा येणाऱ्या बाप्पासाठी प्रत्येकजण आपल्या कल्पकतेने मखराची सजावट करत असतात. त्यामुळे गणेशमूर्तींच्या मागे सोडलेल्या पडद्यावर मोती, कुंदन, काचेच्या माळा, रंगीबेरंगी फुलांच्या तसेच लाईटिंगची तोरणे सोडण्यात येतात. त्यामुळे मखराची अजूनच शोभा वाढते. खऱ्याचाच भास होणाऱ्या  टपोऱ्या फुलांप्रमाणे कागदी, क्रेपच्या फुलांचे गुच्छ, ताटवे, कमान यांनाही सजावटीसाठी विशेष मागणी आहे. या विविध प्रकारच्या रंगीबेरंगी माळा २५ रुपयांपासून अगदी पाचशे रुपयापर्यंत विक्रीला उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवात मखराच्या सजावटीकडे विशेष लक्ष दिले जाते. मखराच्या सभोवताली पानाफुलांच्या माळा, विद्युत रोषणाई केली जाते. त्यासाठी लागणार्‍या विविध वस्तू विक्रीसाठी रत्नागिरी जिल्ह्याची बाजारपेठेत सज्ज झाली आहे. त्यामध्ये लवंगी, स्ट्रॉबेरी, अ‍ॅपल आदी आकारातील संगीत विद्युत माळाही बाजारात आल्या आहेत. १०० रुपयापासून ते ४ हजार रुपये किमतीला या माळा उपलब्ध आहेत. फिरती छत्री, फिरते चक्र विक्रीसाठी असून, एलईडी व एलपीजीचे रंगीत दिवे, विविध रंगांचे फोकस मकराची अधिक शोभा वाढवत आहेत.

चायना माळांपेक्षा स्वदेशी माळांचे दर अधिक असले तरी चायना माल खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय अल्प आहे. स्वदेशी गोष्टींच्या विविध रंगी खरेदीवरच ग्राहकांचा अधिक भर आहे. त्याचप्रमाणे, यावेळी गौराई देखील पूर्वात असल्याने नवदाम्पत्यांचे औवसे आहेत. त्यामुळे गौराईंच्या आगमनासाठी बाजारपेठेत बांबूपासून बनवण्यात आलेली सुपेदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये छोट्या सुपांचे ७५० रुपये तर मोठ्या सुपांचे ८५० रुपये दर आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular