26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeEntertainmentप्रसाद ओकची आनंद दिघेना स्मृतीदिनी अनोखी आदरांजली

प्रसाद ओकची आनंद दिघेना स्मृतीदिनी अनोखी आदरांजली

'माननीय दिघे साहेबांना विनम्र अभिवादन! लवकरच #धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं "माझा आनंद" हे पुस्तक प्रकाशित होत आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनी चित्रपटात त्यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यानं त्यांना अनोख्या पद्धतीनं आदारांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर प्रसादनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादनं घेतलेली मेहनत आणि साक्षात साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेचं सर्वांनी खूप कौतुक केलं.

आदरयुक्त दरारा, समोरच्याच्या उरात धडकी भरवणारी भेदक नजर, धाक, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे, ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांचे व्यक्तिमत्व साकारताना अनेक अनुभव प्रसाद ओक याने सांगितले. सिनेमाच्या सुरुवातीपासून ते प्रदर्शित झाल्यानंतर आलेलेल्या विविध अनुभव आता पुस्तक रुपात येत आहेत. या संदर्भात प्रसाद ओकनं त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधत अभिनेता प्रसाद ओक यानं या पुस्तक प्रकाशनाची बातमी शेअर केली आहे.

प्रसादनं लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे ‘माझा आनंद’. हे पुस्तक मेहता पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत आहे. पहिला फोटो आहे तो पुस्तकाचा आणि दुसरा धर्मवीर आनंद दिघे यांचा त्याने शेअर केला आहे. धर्मवीर सिनेमातील त्याचा प्रवास प्रसादनं आता शब्दरुपात मांडला आहे. या पुस्तकाबद्दल त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘माननीय दिघे साहेबांना विनम्र अभिवादन! लवकरच #धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होत आहे. चित्रपटाइतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा! जय महाराष्ट्र!’ ही पोस्ट प्रसादनं शेअर केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular