27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...

कोत्रेवाडी कचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा…

कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग...
HomeEntertainment'दुसऱ्यांदाही साराचं का?' शुभमन गिलचा व्हिडियो व्हायरल

‘दुसऱ्यांदाही साराचं का?’ शुभमन गिलचा व्हिडियो व्हायरल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तोडला आणि त्यामुळेच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या.

शुभमन गिलने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि एकदिवसीय कारकिर्दीतील शतकही झळकावले. त्या दरम्यान त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तोडला आणि त्यामुळेच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. असं असलं तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारा तेंडुलकर आणि शुभमन एकत्र दिसले नाहीत किंवा त्यांनी या रिपोर्टवर कधीही कोणतंही वक्तव्य केलं नाही.

भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत बऱ्याच काळापासून जोडले जात होते. दरम्यान, आता या युवा सलामीवीराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मुलीसोबत डिनर डेटला गेलेला दिसत आहे. त्या मुलीचे नावही सारा आहे, पण ती सचिनची मुलगी सारा नसून बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान आहे.

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी शुभमनला अनेक प्रश्न विचारत आहेत. ‘ही खरंच सारा अली खान आहे का?’ असा प्रश्न एकाने विचारला तर दुसऱ्या नेटकऱ्याने विचारलं की, ‘दुसऱ्यांदाही साराचं का?’ व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत संभ्रम आहे. काहींच्या मते हा व्हिडिओ दुबईतला असल्याचं म्हटलं जात आहे तर काही रिपोर्टमध्ये तो लंडनचा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडिओमध्ये दोघेही एका रेस्टॉरन्टमध्ये डिनर करताना दिसत आहेत. मात्र, सध्या टीम इंडिया यूएईमध्ये आशिया कप २०२२ खेळत आहे. मात्र तो या संघाचा भाग नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular