26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeEntertainmentआमिर खानने थेट हात जोडत चाहत्यांची माफी मागितली

आमिर खानने थेट हात जोडत चाहत्यांची माफी मागितली

काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं आमिर यात म्हणाला होता.

आमिर खान लाल सिंह चढ्ढा या सिनेमाच्या अपयशाचा मागील काही दिवसांपासून सामना करत आहे. पण आता त्याने थेट हात जोडत चाहत्यांची माफी मागितली आहे. आमिर खानच्या आमिर खान प्रोडक्शन या त्याच्या व्यावसायिक सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्याने ही पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर केली होती. यामध्ये त्याने ‘आपण सर्वजण माणसं आहोत आणि चुका या माणसांकडूनच होतात’, असं म्हटलं आहे.

बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्या जुन्या व्हायरल व्हिडियो मुळे आणि लाल सिंघ चढ्ढाच्या अपयशामुळे अनेक दिवस चर्चेत आहे. सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा अपयशी ठरला म्हणून त्यानं माफी मागितली. पण त्यामुळे पुन्हा तो ट्रोल झाला. त्यानंतर आमिरनं तो व्हिडिओ डिलीट केला. पण पुन्हा काही मिनिटांनी पोस्ट केला. यामुळे नेटकरी नेमके काय सुरु आहे आमिरचे म्हणून संतापले होते.

सध्या सप्टेंबर महिन्यातील मच्छामि दुक्कडम हे पर्व सुरू आहे. या काळात आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याविषयी माफी मागितली जाते. याच पर्वाच्या निमित्ताने आमिर खान याने हा व्हिडिओ शेअर केला असल्याचे बोलले जाते आहे. काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं आमिर यात म्हणाला होता.

सध्या आमिर खाननं सिनेमातून ब्रेक घेतला आहे. तो सॅन फ्रॅन्सिस्को इथे गेलाय. रस्त्यावर भटकंती करतानाचा त्याचा फोटोही समोर आला आहे. एका स्पॅनिश सिनेमाचा सुट्टीवरून परत आल्यावर आमिर रिमेक करणार असल्याच वृत्त कळतं आहे परंतु, अद्याप त्याबाबतीत अधिकृत काहीही पुढे आलेलं नाही.

RELATED ARTICLES

Most Popular