22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunभोगाळेतील युनियन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला

भोगाळेतील युनियन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैंद असले तरी त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

भोगाळे येथे युनियन बँकेच्या शाखेच्या परिसरातच बँकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी गणेशोत्सवानिमित्त बँकेला सुट्टी होती. हीच आयती संधी साधून चोरट्यांनी पहाटे ४.२४ वाजता एटीएम फोडले. शहरातील गजबजलेल्या भोगाळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १४ लाख ५० हजाराची रोख रक्कम गुरुवारी पहाटे लंपास केली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैंद असले तरी त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तरीही पोलीस हर तर्हेने चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्राथमिक अंदाजामध्ये चोरट्यांची सिल्व्हर रंगाची मोटार असून ते चार ते पाचजण असावे, असे म्हटले आहे. मोटार कोणत्या दिशेच्या रस्त्याने गेली यासाठी सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई देखील चिपळूणला दाखल झाल्या आहेत. युनियन बँकेकडून एटीएम मॅनेजर संतोष काशिराम झगडे यांनी याची फिर्याद चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे पुढील तपासाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ही धाडसी चोरी असून पोलिस संपूर्ण राज्यभर चक्रे फिरवित आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिस तपासत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी, रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वाघमारे, जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शाह व त्यांचे सहकारी, चिपळूणचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी या तपास कामात गुंतले आहेत. त्यामुळे लवकरच चोरटे मुद्देमालासह सापडतील अशी आशा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular