30.1 C
Ratnagiri
Sunday, May 19, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeMaharashtraमनसे पदाधिकाऱ्याने महिलेला केलेल्या मारहाण प्रकरणी पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी

मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला केलेल्या मारहाण प्रकरणी पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी

मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबादेवी परिसरात मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी मनसेने आपली भूमिका स्पष्ट करत पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला अजून पोलिसांनी विनोद अरगिले यांच्यासह राजू अरगिले व सतीश लाड या दोघांना ताब्यात घेतले आहे.

मुंबादेवी परिसरात एका मंडळाच्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होता. त्यासाठी व बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांसमोर बांबू ठोकले जात होते. त्यावेळी एका मेडिकल शॉपसमोर बांबू लावण्यास पीडित महिलेने विरोध दर्शवल्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली. महिलेच्या तक्रारीनुसार नागपाडा पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या विरोधात नागपाडा पोलिसांनी कलम ३२३, ३३७, ५०६, ५०४, ५०९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर आता मनसेकडून याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाबत पक्षाच्यावतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे, असे नांदगांवकर म्हणाले. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular