25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplun१० मिनिटांच्या प्रवासासाठी, तासभर खोळंबा

१० मिनिटांच्या प्रवासासाठी, तासभर खोळंबा

दोन दिवस तब्बल अर्धा तास वाहतूककोंडी होऊन महामार्गावर वाहनांच्या रांग लागल्या होत्या.

गणपती उत्सवासाठी गावाकडे चाकरमानी आले. त्यामुळे गेल्या आठवड्यात देखील या मार्गावर चाकरमानी तासनतास अडकून राहिले होते. येथे १० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर वेळ खर्ची पडत आहे. बहादूरशेख नाक्यावरून कराड, चिपळूण शहर आणि मुंबई-गोव्याकडे अशा चार दिशांना जाण्यासाठी मार्ग आहेत. चारही मार्गावर जाणाऱ्या वाहनांची येथे संख्या मोठी असते. प्रत्येकाला लवकर पोहोचण्याची घाई असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवत असतो. त्यात स्थानिक वाहनचालकांना देखील वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.

बहादूरशेख नाक्यावर वाहतूककोंडीची समस्या नेहमीची झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने हा त्रास आणखी वाढला आहे. गेले आठवडाभर वाहनचालक, प्रवाशांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आता परतणाऱ्यांनाही हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवार, बुधवारी दोन दिवस तब्बल अर्धा तास वाहतूककोंडी होऊन महामार्गावर वाहनांच्या रांग लागल्या होत्या. १० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर वेळ खर्ची पडत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर चिपळुणात एकमेव सीएनजी पंप आहे. त्या ठिकाणी वाहन थांबवण्यासाठी जागा आहे. त्यात रस्ता अरूंद आहे. शहरात उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. गेले आठवडाभर वाहनचालक, प्रवाशांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अजून पुढील दोन-तीन दिवस देखील अनंत चतुर्दशी नंतर विकेंडची सुट्टी असल्याने महामार्ग वाहनाच्या गर्दीने फुललेला असणार आहे. त्यामुळे वाहतूक नियम आणि व्यवस्थेचे तीन तेरा वाजण्याची शक्यता दिसून येत आहे. अर्थात सर्वत्र वाहतूक पोलीस कोंडी दूर करण्यासाठी सक्रीय ठेवण्यात आलेले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular