27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeRatnagiriभाट्ये समुद्रकिनारी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम पार

भाट्ये समुद्रकिनारी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम पार

किनार्यावर जमा होणारे प्लास्टिक आणि प्लास्टीक मुळे होणारे प्रदूषण हि एक जागतिक समस्या बनली आहे.

सागरी स्वच्छता अभियान जनजागृतीबाबत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय ते भाट्ये बीच अशी रॅली काढण्यात आली. ह्यावेळी “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर”, “सबको आगे आना है, सागर को बचाना है’ घोषणा देण्यात आल्या. त्या नंतर भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ह्यावेळी १ किलोमीटर किनारपट्टीतील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. ह्यामध्ये मिनरल वॉटरच्या बाटल्या, खाद्यपदार्थावरील वेष्टने, थर्माकॉलचे तुकडे, प्लास्टिक पिशव्या, मासेमारीची जाळी, कापडी पिशव्या, चप्पला, इ. अनेक विघटक घटकांचा समावेश आहे.

नेटफिश- एमपीईडिए म्हणजे वाणिज्य आणि, उद्योग मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे एनएसस अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी ह्यांच्या संयूक्त विद्यमाने ०८ सप्टेंबर,२०२२ रोजी सकाळी ८ ते १०.३० ह्या कालावधीत भाट्ये समुद्रकिनारी “आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम” पार पडला. किनार्यावर जमा होणारे प्लास्टिक आणि प्लास्टीक मुळे होणारे प्रदूषण हि एक जागतिक समस्या बनली आहे. प्लास्टिक हे परिसरात इतस्ततः न टाकता ते कचराकुंडीत जमा करावे, असे विशेष आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक श्री. संतोष कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी,  कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर,  प्रा. अपर्णा तगारे, प्रा. भालचंद्र रानडे,  प्रा. मानसी गानू,  प्रा. शिवाजी जाधव,  नेटफिशचे श्री. नितीन जावरे, श्री. मयुरेश शिवलकर व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ७० स्वयंसेवक सहभागी झाले. नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम तसेच प्राध्यापक निनाद तेंडूलकर ह्यांनी समुद्री प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

Most Popular