प्रत्येक माणसाच्या अंगी काही ना काही नवनवीन घडवण्याचे, करण्याचे एक ध्येय असते. प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या, छंद वेगळे. छंदांचा विचार केला तर काही जणांना पुरातन वस्तूंचे फार आकर्षण असते, तरा काही जणांना नवीन जुनी नाणी, वेगवेगळ्या सालांची नाणी, वेगवेगळ्या देशांची चलन गोळा करणे, फोटोग्राफी, तर काही जणांना नवीन काही घडत आहे तर त्याचा अनुभव घेण्यासाठी माझा प्रथम क्रमांक असावा. रत्नागिरीमधील प्रसिद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालय मधील प्रा. उदय बोडस सर्वाना परिचित असतीलच.
आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. कोकणामध्ये रेल्वे सुरु व्हावी असे अनेक जणांचे स्वप्न होते, परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरु होणाऱ्या प्रत्येक नवीन रेल्वेच्या उद्घाटनाच्या फेरीतील प्रथम प्रवासी सुद्धा मीच असावा असे वाटणारे रत्नागिरीतील एक व्यक्तिमत्व प्रा. उदय बोडस. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण २१ नवीन सुरु झालेल्या रेल्वेच्या गाडयांचा पहिला प्रवासी म्ह्णून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.
दि. १० जुन २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव या नवीन एलएचबी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस गाडीच्या फेरीचा पहिला प्रवासी म्हणून प्रवास करण्याची इच्छा असताना सुद्धा कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे ही गोष्ट शक्य होणार नसल्याची खंत त्यांना जाणवत आहे. २०१९ साली जेंव्हा कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये परिवर्तन करण्यात आले होते, तेंव्हा प्रा. बोडस यांनी मडगाव ते रत्नागिरी असा उदघाटन फेरीचा प्रवास केला होता. येत्या १० जूनच्या जनशताब्दीच्या नवीन फेरीचा प्रवास जर शक्य झाला असता तर त्यांच्या आयुष्यातील २२ व्या नवीन रेल्वेचा प्रवास पूर्ण झाला असता. पण सध्या कोरोना केसेसचे प्रमाण वाढल्याने स्टे होम स्टे सेफ हा नियम पाळणेच गरजेचा आहे.