26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriजिल्ह्यातील म्यूकरमायकोसीसचा आढावा

जिल्ह्यातील म्यूकरमायकोसीसचा आढावा

कोरोना नंतर म्यूकरमायकोसीस नावाचा नवीन आजार उत्पन्न झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्यूकरमायकोसीस संक्रमितांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वी या आजाराचा एक बळी गेला आहे. म्यूकरमायकोसीस म्हणजे काळी बुरशी सदृश्य आजार. कोरोनानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्यूकरमायकोसीसचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. म्यूकरमायकोसीसचा विषाणू जास्त करून डोळ्यांवर इजा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्यूकरमायकोसीस या विषाणूचे जिल्ह्यामध्ये आजतागत ८ रुग्ण सापडले आहेत.

जिल्हयामध्ये म्यूकरमायकोसीस उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी याआधी जिल्हयातील २ रुग्णांवर मुंबई केईएम रुग्णालय येथे उपचार सुरु असताना मृत्यू ओढवला होता. यामुळे या विषाणूंमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची जिल्ह्यातील संख्या एकूण ३ झाली आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये म्यूकरमायकोसीस या विषाणूशी लढणारे आणखी ३ रुग्ण दाखल केलेले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. बाकी दोघांवर उपचार सुरु आहेत.

रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्र फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या म्यूकरमायकोसीस विषाणूच्या आजारावर इंजेक्शन आणि ऑपरेशन हाच पर्याय उपलब्ध आहे. जशी काळी बुरशी, तशीच पांढरी बुरशी आणि आता पिवळी बुरशीचे प्रकार समोर येत आहेत. परंतु, म्यूकरमायकोसीस म्हणजेच काळी बुरशीचे प्रत्यक्ष धोके जाणवू लागले आहेत.

राज्य प्रशासन राज्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि काही अंशी त्याला यश देखील येऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. पण त्यानंतरचा हा म्यूकरमायकोसीचा धोका सुद्धा वाढतचं चालला असल्याने आरोग्य यंत्रणेचे नियंत्रणासाठी जोमाने प्रयत्न सुरु आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular