26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriजिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा !

जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा !

कोरोनाचा वाढता प्रभाव आणि लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून अख्खा देश ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांपासून ते लहान मुलांवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसून येतो आहे. मागील वर्षापासून ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब सुरु केल्याने जरी घर बसल्या शिक्षण सुरु असले तरी, हि शिक्षण पद्धती अजून पालक आणि विद्यार्थी वर्ग मनापासून स्वीकारायला तयार नाही. शहरी भागामध्ये इंटरनेट, मोबाईल स्मार्ट फोन, लॅपटॉप, राऊटर, वायफाय या सुविधा सहज शक्य असल्याने त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू आहे. प्रश्न आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जर सुविधाच नसतील तर कसे शिक्षण घेणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेत शिकत असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक साधनसामग्रीचा अभाव असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. तसेच ग्रामीण भागातील पालकवर्ग सुद्धा आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताची असल्याने हि ऑनलाईन शिक्षण पद्धती त्यांना परवडणे कठीण झाले आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणामध्ये येणाऱ्या व्यत्ययामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिकायची इच्छा असूनही शैक्षणिक अद्ययावत साधनसामुग्री अभावी शिक्षण कसे पूर्ण होणार याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर जास्त प्रमाणात होण्याचा संभाव्य धोका असल्याने यावर्षी सुद्धा ऑनलाईन शिक्षण प्रणालीच अवलंबली जाण्याची शक्यता दाट आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने मोबाईल टॅब देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular