25.6 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriरत्नागिरी सर्व तर्हेने व्हेंटिलेटरवर !

रत्नागिरी सर्व तर्हेने व्हेंटिलेटरवर !

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी साधारण गेल्या २ महिन्यापासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर सुद्धा आठवडाभराचे कडक लॉकडाऊन सुद्धा करण्यात आलेले, परंतु तरीसुद्धा कोरोना संक्रमित रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव नाही. तसेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालयामधून जिथे खाजगी मध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असेल तिथे हलवण्यात यावे असे सांगण्यात येत आहे. सर्वच जनतेला खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही, त्यामुळे काही वेळा ऑक्सिजन बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरीच व्हेंटिलेटरवर असल्याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहे.

कोरोना महामारीचा दुसऱ्या लाटेचा फटका रत्नागिरीला चांगलाच बसला आहे. या कोरोनाच्या लाटेमध्ये तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा या कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. रोज बातम्यांमध्ये येणारे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या, संक्रमितांची संख्या त्यामुळे सध्या रत्नागिरीची अवस्था विदारक झाली आहे ते लक्षात येते. दररोज संक्रमितांचा आकडा ५०० च्या आसपासच असतो, कोरोना संक्रमित रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आणि व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेडच्या अपुऱ्या सोयीमुळे रुग्णांचा जीव वेटिंग वर आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने प्रशासकीय यंत्रणेला सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु, एवढ्या गंभीर परिस्थितीमध्येसुद्धा सत्ताकारण आणि सत्ताधीश प्रशासनाचा मनमानी पद्दतीने कारभार सुरु आहे. रत्नागिरीची सर्व तर्हेनेच एवढी भयानक अवस्था असताना सुद्धा लोकप्रतिनिधीही या सगळ्याकडे कानाडोळा करत आहेत. रुग्णसंख्येनुसार व्हेंटिलेटर बेडस जर उपलब्ध होत नसतील, तर भविष्यामध्ये आतापेक्षा कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular