29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeKokanसुपरफास्ट कोकणकन्याचे बुकिंग सुरु, तिकीट दरात वाढ

सुपरफास्ट कोकणकन्याचे बुकिंग सुरु, तिकीट दरात वाढ

२० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या सुपरफास्ट नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. त्‍या गाडीच्या बुकिंगला प्रारंभ झाला आहे.

कोकणकन्या या गाडीला २० जानेवारीपासून एक्‍सप्रेस श्रेणीतून सुपरफास्ट श्रेणीत बढती मिळणार आहे. त्‍यामुळे २० जानेवारीपासूनचे बुकिंग बंद ठेवले होते. दि. २२ पासून २० जानेवारी आणि त्‍यापुढील तारखांचे बुकिंग सुरू करण्यात आले. यात स्लीपर कोच श्रेणीच्या तिकीट दरामध्ये ३० रूपयांची वाढ झाली असून, पूर्वी कणकवली ते सीएसएमटी पर्यंत जाण्यासाठी ३४० रूपये तिकीट दर होता. २० जानेवारी पासून याच प्रवासासाठी ३७० रूपये मोजावे लागणार आहेत. तर वातानुकुलीत थ्री टियरच्या आणि २ टियर दरात देखील प्रत्‍येकी ४५ रूपये वाढ करण्यात आली आहे.

कोकणकन्या ही गाडी १०१११ आणि १०११२ या क्रमांकासह धावते मात्र २० जानेवारी पासून हे क्रमांक २०१११ आणि २०११२ असे होतील अशी माहिती रेल्‍वे कडून देण्यात आली. कोकण रेल्‍वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्‍सप्रेसचा दर्जा वाढवून सुपरफास्ट करण्यात आल्‍यानंतर स्लीपर श्रेणीच्या तिकीटांत ३० रूपयांची वाढ झाली आहे. २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या सुपरफास्ट नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. त्‍या गाडीच्या बुकिंगला प्रारंभ झाला आहे.

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), रत्नागिरी (४.४५), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६), थिवीम (८.१०), करमाळी (८.३२) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल.

कोकण कन्या एक्सप्रेस सुपरफास्ट झाल्यानंतर काही छोटे थांबे रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र कोकण रेल्वेने याबाबत जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार आधीच्या कुठल्याही थांब्यामध्ये सध्या तरी बदल करण्यात आलेला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular